मुंबई

जे डब्ल्यू आर गोदामाला भिषण आग

CD

जेडब्ल्यूआर गोदामाला भीषण आग
डीशेडसह ४० पेक्षा जास्त कंटेनर खाक
उरण, ता. १८ (बातमीदार) ः जेएनपीए बंदर परिसरातील गव्हाणफाटा येथील मालाची हाताळणी करणाऱ्या जेडब्ल्यूआर या गोदामात अति ज्वलनशील मालाला भीषण आग लागली. ही घटना शनिवारी (ता. १८) दुपारी घडली. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
दुपारी जेएनपीए बंदर परिसरातील राष्ट्रीय महामार्ग ४ ‘ब’लगत असणाऱ्या गव्हाणफाटा येथील मालाची हाताळणी करणाऱ्या जेडब्ल्यूआर या गोदामात भीषण आग लागली. यामध्ये जेडब्ल्यूआर गोदामातील अति ज्वलनशील विभाग डी शेड संपूर्ण खाक झाले. तसेच गोदामाच्या आजू-बाजूचे कंटेनरही जळाल्याचे समजते. कंपनी प्रशासनाकडून काही कंटेनर कलमारच्या साह्याने बाजूला हलवण्यात आले. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग अति ज्वलनशील कार्गोला लागल्याने अग्निशामक दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. अग्निशामक दलाच्या सिडको विभागाकडून जेएनपीए, पनवेल महापालिकेकडून अशा एकूण आठ ते दहा अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल आहेत.

अग्निशमन यंत्रणा नाही
या ठिकाणी आगीच्या ज्वाळा तसेच धुराचे लोट उसळल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गोदामात काम करणारे कामगार आपला जीव मुठीत धरून पळाल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. जेएनपीए बंदर परिसरात मोठ्या प्रमाणात देश-परदेशात मालाची आयात-निर्यात करणारी तसेच मालाची साठवणूक करणारी गोदाम आहेत. या गोदाम किंवा कंटेनर यार्डमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याने वारंवार अशा प्रकारच्या आगी लागण्याच्या घटना घडत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khambatki Ghat Traffic Jam : खंबाटकी घाटात ST बस ठप्प; विकेंडला पुणे-सातारा महामार्गावर भीषण ट्रॅफिक कोंडी!

अवघ्या ६ महिन्यात संपणार स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका? 'त्या' पोस्टमुळे चर्चांना उधाण, 'या' मालिकेची वेळ बदलली

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सने घरात घुसून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नमवले; डेव्हिड मिलरने ३ चेंडूंत फिरवली मॅच, गुणतालिकेत बदल

Phulambri News : शेतकऱ्यांच्या शेतातच मृत्यूचा सापळा..! लोंबकाळणाऱ्या वीजतारांनी वाढवला धोका; महावितरण विभागाचे दुर्लक्ष

Doordarshan Veteran Passes Away: दूरदर्शनच्या सुवर्णकाळावर मोहोर उमटविणारे ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक अरुण काकतकर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT