मुंबई

‘महाराष्ट्र बॉक्सिंग’च्या अडचणी मुख्यमंत्र्यांकडे मांडणार!

CD

‘महाराष्ट्र बॉक्सिंग’च्या अडचणी मुख्यमंत्र्यांकडे मांडणार!
मुंबई, ता. १८ : महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अडचणी आणि समस्या सोडविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री यांची शिष्टमंडळामार्फत भेट घेण्याचा निर्णय महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या ९४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आल्याची माहिती बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली.

महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर म्हणाले, की महाराष्ट्रातील बॉक्सिंगच्या प्रगतीच्या दृष्टीने आणि या खेळाला वैभवाचे दिवस आणण्यासाठी अनेक योजना आणण्याचे या शंभर वर्षांच्या जुन्या असोसिएशनने ठरवले आहे. बॉक्सिंग खेळाडूंच्या तसेच प्रशिक्षकांसंदर्भात विद्यार्थ्यांकडून कमी फी घेण्यासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आज सभेत झाले. बॉक्सिंग असोसिएशनच्या अनेक अडचणी व समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि क्रीडामंत्र्यांना शिष्टमंडळ भेटण्याचे बैठकीत ठरले आहे. राज्यातील आठ विभागांत मोठ्या रकमेच्या चांगल्या स्पर्धा घेण्याचे ठरले. अखेरीस राज्यस्तरीय एक मोठी स्पर्धा महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन घेईल.

वार्षिक सर्वसाधारण सभेला आजीव अध्यक्ष जय कवळी, महासचिव भारतकुमार व्हावळ, कोषाध्यक्ष मनोज पिंगळे, उपाध्यक्ष पंकज भारसाकळे, मुन्ना कुरणे, मिलिंद साळुंखे, तुषार रंधे, अविनाश बागवे, संग्राम गावंडे, ॲड. गौतम चाबुकस्वार, गौरव चांडक, राजेश देसाई, ॲड. शेख अकबर, वैभव वनकर, संतोष आंबेकर, विक्रांत खेडकर, नील पाटील, कॅप्टन शाहूराज बिराजदार, विजय सोनवणे, कार्यकारी सचिव शैलेश ठाकूर, प्रशासकीय सचिव महेश सकपाळ, विभागीय सचिव मयूर बोरसे, मंगेश कराळे, ॲड. संपत साळुंके, अरुण भोसले, विजयकुमार यादव, विजय गोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT