मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना
सिएना, पेरूजियात शिक्षणाची संधी
मुंबई, ता. १८ : मुंबई विद्यापीठाच्या युरोपियन अभ्यास केंद्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इटलीतील सिएना आणि पेरूजिया येथील नामांकित विद्यापीठांमध्ये इटालियन भाषा व संस्कृतीच्या अध्ययनासाठी मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत बी.ए. व एम.ए. (फ्रेंच अभ्यास) या अभ्यासक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यातील चार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची संधी उपलब्ध झाली आहे.
सप्टेंबर आणि नोव्हेंबर २०२६ मध्ये हे विद्यार्थी अध्ययनासाठी इटली येथे रवाना होणार आहेत. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात या अभ्यासक्रमातील दोन आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना एका सत्रासाठी मुंबई विद्यापीठात अध्ययनाची संधी उपलब्ध करून दिली जाते. विशेष म्हणजे, इटलीच्या परराष्ट्र मंत्रालयामार्फत इटालियन नागरिक डॉ. अॅना फेरारा यांची सहा वर्षांसाठी पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून येथे नियुक्ती करण्यात आली आहे. बोलोनिया विद्यापीठासोबत ‘इरासमस प्लस’ आंतरराष्ट्रीय क्रेडिट मोबिलिटी प्रोग्रामअंतर्गत मुंबई विद्यापीठातील एम.ए. (फ्रेंच) तृतीय सत्रातील एका विद्यार्थ्यांला पाच महिन्यांसाठी इटलीत शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. मुंबई विद्यापीठाच्या सामंजस्य करारामुळे परदेशात मिळवलेले शैक्षणिक गुण मुंबई विद्यापीठात हस्तांतरित केले जात असून, विद्यार्थ्यांना चौथे सत्र येथे पूर्ण करणे सुलभ होते.
-------
इटलीतील नामांकित विद्यापीठांमध्ये मिळालेल्या या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना केवळ भाषा व संस्कृतीचे ज्ञानच नव्हे, तर जागतिक दृष्टिकोन विकसित करण्याचीही मोठी संधी मिळणार असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि स्पर्धात्मकता निश्चितच अधिक बळकट होईल.
- प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.