मुंबई

डेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी

CD

डेटा सेंटर कंपन्यांना जागा त्वरित उपलब्ध करून द्या : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई, ता. १८ : जगभरातील डेटा सेंटर क्षेत्रातल्या कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी उत्सुक आहेत. करार झाल्यानंतर संबंधित कंपन्यांना त्वरित जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे डेटा सेंटर्ससंदर्भात सादरीकरण आणि बैठक झाली. या वेळी उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत दूरदृश्‍य प्रणालीद्वारे उपस्थित होते. या वेळी महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अंबळगन, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक व धोरणविषयक सल्लागार कौस्तुभ धवसे उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की डेटा सेंटर क्षेत्रातील जगभरातील अनेक नामांकित कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी उत्सुक असून, या कंपन्यांच्या प्रकल्प उभारणीसंदर्भातील सर्व अत्यावश्यक कामे व प्रामुख्याने जमीन उपलब्ध करून देण्याची कामे पूर्ण करण्यात यावीत. तसेच या संबंधित कंपन्यांना विजेची उपलब्धताही प्राधान्याने करून द्यावी. संबंधित यंत्रणांनी ही कामे त्वरित होतील, याबाबत दक्षता घ्यावी. सिडकोने यासाठी लॅण्डबॅंक विकसित करावी. ऊर्जा विभागाने सब स्टेशनसाठी जागा त्वरित उपलब्ध करून घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी दिले.
--
डेटा सेंटरसाठी पायाभूत सुविधा
डेटा सेंटरसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती सिडकोच्या वतीने तर डेटा सेंटर क्षेत्रातील कंपन्यांसाठी पुरेशा विजेची उपलब्धता करून देण्यात येत असल्याची माहिती ऊर्जा विभागामार्फत देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

Hormuz Strait : होर्मुझ तणाव पेटला! भारतीय जहाजावर गोळीबारानंतर मोदी सरकारचा राग उफाळला; इराणी राजदूतांना समन्स

Senior Living Athashri: परांजपे स्कीम्सच्या ‘अथश्री’ला रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती; वडोदऱ्यात सहा हजाराव्या ज्येष्ठ रहिवाशाला घराचा ताबा

Satara Politics: पाटणच्या पाणीप्रश्नावरून शंभुराज देसाईंचा पाटणकरांना अप्रत्यक्ष टोला; ठेकेदार व अधिकाऱ्यांना तात्काळ कामाला लावण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT