निदा खानचे रुग्णालयात उपचार
मुंब्र्यातील डाॅक्टरची माहिती
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : नाशिक धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिच्याबाबत आणखी नवी माहिती पुढे आली आहे. ती गरोदर असून उपचारासाठी मुंब्रा परिसरातील एका खासगी रुग्णालयात दोन वेळा गेली होती. तसेच तिने उपचार घेणाऱ्या डॉक्टरांकडून वैद्यकीय रजेची चिट्टी मागितल्याचे डॉ. शमायला आझमी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
निदा खान ११ आणि १३ एप्रिलला रुग्णालयात आली होती. येताना पहिल्यांदा ती आपल्या पतीसोबत उपचारासाठी आली होती. तर दुसऱ्यांदा ती एकटीच रुग्णालयात दाखल झाली. सुरुवातीला तिने घरीच प्राथमिक तपासणी करून घेतली होती. त्यानंतर तिने रुग्णालयात येऊन पुढील उपचार घेतले. तिला पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळे प्रवास करताना अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे विश्रांती घेण्यासाठी तिने रुग्णालयाकडून वैद्यकीय रजेची चिट्टी मागितली.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून, निदा खानच्या हालचालींबाबत विविध तपशील समोर येत आहेत. तिच्या रुग्णालय भेटींमुळे तपासात आणखी महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.