नवनवीन प्रयोगात बळीराजा मग्न
उन्हाळी भाताबरोबर कांदा लागवडीकडे कल
कासा, ता. १९ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीबरोबरच विविध प्रयोगांकडे वळताना दिसत आहेत. उन्हाळी भातशेतीबरोबर अतिरिक्त उत्पन्नासाठी पालेभाज्या तसेच इतर नगदी पिकांची जोड देत आहेत. त्यामुळे शेतीत नवनवीन प्रयोग करण्यात बळीराजा मग्न आहे.
मुरबाड येथील शेतकरी कैलास धानमेर यांनी सहा एकर शेतात पांढऱ्या, लाल कांद्याची यशस्वी लागवड करून चांगले उत्पादन घेतले आहे. दर्जेदार बियाणे, सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे कांद्याचे उत्पन्न समाधानकारक आले आहे. सध्या बाजारात कांद्याचे दर घसरले असले तरी स्थानिक पातळीवर ताज्या कांद्याला मागणी आहे. पावसाळ्यासाठी कांद्याची साठवणूक केली जात असल्याने थेट शेतात जाऊन खरेदी केली जात आहे. त्यामुळे कांद्याचे दर जरी कमी असले तरी थेट विक्रीमुळे चांगले उत्पन्न मिळत आहे. या प्रयोगामुळे परिसरातील इतर शेतकरी नगदी पिकांकडे वळले आहेत.
-----------------------------
किलोला २० रुपयांचा भाव
मिरची, भेंडीची लागवड करीत होते; मात्र यंदा चांगल्या प्रतीचे कांद्याचे बियाणे मिळाल्याने त्यांनी कांद्याकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या शेतातील निचरा होणारी जमीन कांदा पिकासाठी पोषक ठरली. सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब केल्याने उत्पादनाची गुणवत्ता वाढली आहे. सध्या कांदा २० रुपये किलो दराने विकला जात असून, कांद्याची माळ १०० रुपयांना विकली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.