खेळाडूंच्या भवितव्याशी खेळ
क्रीडा संकुलासाठी निकृष्ट साहित्य; मनसे आक्रमक
वाडा, ता. १९ (बातमीदार)ः तालुक्यातील कोने येथील तालुका क्रीडा संकुलाचे बांधकाम वादात सापडले आहे. या कामासाठी गंज लागलेल्या लोखंडाचा वापर करण्यात येत असल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कामाची पाहणी करून बंद पाडले आहे.
तालुक्यासाठी अभिमानास्पद असलेल्या क्रीडा संकुलाबाबत मनसे सुरुवातीपासून आक्रमक आहे. हे संकुल उभे राहण्यासाठी गेली १० वर्षे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. तालुका स्तरापासून जिल्हा स्तरापर्यंत वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन कामासाठी पुढाकार घेतला होता. अशातच या क्रीडा संकुलाच्या कामासाठी वापरलेले लोखंड गंजलेले असल्याने तसेच संकुलाची जागा नरम असल्याने व्यवस्थित खोदकाम काम करावे, अशी मागणी करताना काम बंद पाडले आहे. तसेच तालुक्यातील खेळाडू, क्रीडा शिक्षकांनी कामाचा दर्जा चांगला राहण्यासाठी लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.
-----------------------
अडथळ्यांची शर्यत
या संकुलासाठी ७५ लाख इतका निधी २०१९ मध्ये मंजूर झाला होता. त्यामध्ये १६ एकर जागेला संरक्षक भिंत बांधण्यात आली. त्यानंतर चार वर्षे कुठलेही काम अथवा निधी आला नाही, परंतु पुन्हा जून २०२५ मध्ये मनसेकडून पत्रव्यवहार करून आंदोलनाचा इशारा देण्यात आला. त्यानंतर आता दोन कोटी सत्तर लाख इतका निधी संकुलासाठी उपलब्ध झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.