मुंबई

जंगलातील वनव्यांमुळे वनसंपत्ती होतेय नष्ट:

CD

शिकारीसाठी जंगलांची राखरांगोळी
विक्रमगड तालक्यात वणवे लागण्याचे सत्र
विक्रमगड, ता. १९ (बातमीदार)ः तालुक्यातील अनेक भागांत मार्च-एप्रिलमध्ये जंगलांना वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. या आगीमुळे मौल्यवान वनसंपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, तर दुसरीकडे शिकारीसाठी जंगलांची राखरांगोळीमुळे वन्यजीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
काही वर्षांपासून जंगलात आगी लावण्याचे प्रमाण वाढले आहे. भाताची रोपे बनवण्यासाठी जंगलातील गवत ओढून त्याची राबणी केली जात होती. मात्र, आता राबणीचा प्रकार कमी होत चालल्याने तसेच पाळीव जनावरे नसल्याने जंगलात गवत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच ससे, रानडुक्कर यांची शिकार करण्यासाठी शिकारी जंगलांना आगी लावल्या जात आहेत. या वणव्यांमध्ये नवीन उगवलेली जंगली झाडांची रोपे जाळून खाक होत आहेत. तसेच जंगलातील पक्षांची घरटीदेखील जळून जातात. तसेच वन विभागाने वणव्यांवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजनांची मागणी केली जात आहे.
-------------------------- - --- -----–------------------------
मुक्या जनावरांची भटकंती
आठ ते १० वर्षांपूर्वी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पशुधन असायचे. मात्र, आत्ता हे प्रमाण खूपच कमी झाले आहे. पूर्वी एका घरी १५ ते २० जनावरे होती, पण आता गावांमध्ये मिळून २० ते २५ जनावरे आढळून येतात. उन्हाळ्यात गुरांना चरण्यासाठी गवत मोठ्या प्रमाणात जंगलात आहे, पण वणव्यांमुळे संपूर्ण जंगल जळून राख होत असल्याने मुक्या जनावरांना भटकावे लागत आहे.
------------------------
सध्या जंगलात वणवे लावण्याचे प्रमाण वाढले आहे. वन विभागाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. वृक्षारोपणावर करोडो रुपये खर्च करण्यापेक्षा वणव्यांवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
-स्वप्नील ठाकरे, निसर्गप्रेमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरे इच्छुक असतील तर पाठिंबा देणारच: आमदार रोहित पवार : एसआयआरच्या सॉफ्टवेअरमुळे मतदारांना फटका!

CSK चे टेन्शन आणखी वाढणार... आयुष म्हात्रे पुढचे सामने खेळणार की नाही? दुखापतीवर आले अपडेट

LPG Demand Drop India : देशात 'एलपीजी'ची मागणी घटली, वाढत्या दरांचा ग्राहकांवर ताण? नेमकं कारण काय...

Vaibhav Sooryavanshi: वैभवची IPLमधील वर्षपूर्ती! १५ वर्षीय फलंदाजाचे जगाला नोंद घ्यायला लावणारे १० दमदार कारनामे

आयुष म्हात्रेच्या दुखापतीबाबतीत CSK कडून निष्काळजीपणा... R Ashwin कडून कडाडून टीका

SCROLL FOR NEXT