वसई काँग्रेसमध्ये फेरबदलाचे वारे
नव्या जिल्हाध्यक्ष निवडीसाठी हालचालींना वेग
विरार, ता. १९ (बातमीदार)ः पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेसतर्फे देशपातळीवर संघटन सृजन अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत वसईत काँग्रेस नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसह नव्या जिल्हाध्यक्षांची निवड होणार आहे.
वसई काँग्रेसमध्ये नव्या नियुक्त्यांची मागणी होती. काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी, जनसामान्यांशी थेट संवाद साधण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या संकल्पनेतून संघटन सृजन अभियान देशभरात राबवण्यात येत आहे. वसईतील पारनाका येथील काँग्रेस भवन येथून सृजन संघटन अभियान सुरू आहे. या अभियानाद्वारे बूथ स्तरापासून जिल्हा स्तरापर्यंतच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयासाठी नऊ प्रभाग समित्या, ग्रामीण भागाची एक समिती अशा १० ब्लॉकसाठी ब्लॉक अध्यक्ष निवडले जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष आल्मेडा यांनी सांगितले.
---------------------
नालासोपाऱ्याला बहुमान
वसई-विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदासाठी २६ नावे पुढे आली आहेत. यापूर्वी वसई विधानसभा मतदारसंघात दोन वेळा जिल्हाध्यक्षपद गेले. त्यामुळे यंदा नालासोपारा विधानसभा मतदारसंघाला जिल्ह्याधक्षपद दिले जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.