कॉम्रेड चव्हाण यांचे निधन
जव्हार (बातमीदार) ः तालुक्यातील जनआंदोलनातील ठाम, लढवय्या चेहरा, अशी ओळख असलेले कॉम्रेड चव्हाण यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने जनतेसाठी झटणारा कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. लाल बावटा चळवळीतून त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली होती. कॉम्रेड गोदाताई परुळेकर यांच्या विचारांच्या प्रभावातून शेतकरी, आदिवासी व कामगारांच्या हक्कांसाठी अनेक लढे उभारले होते. जंगल हक्क, जमीन हक्क, वेठबिगारीविरोधात सातत्याने आवाज उठवला. आरपीआय (आठवले गट) मध्ये प्रवेश करून सामाजिक न्यायाच्या लढ्याला नवी दिशा दिली. त्यांच्या संघर्षमय कार्याची छाप जनमानसात कायम असून, एक खंबीर जननेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.