स्वामीनारायण गुरुकुल संस्थेमध्ये साडेपंधरा लाखांचा अपहार
खालापूर, ता. १९ (बातमीदार) ः तालुक्यातील स्वामीनारायण गुरुकुल संस्थेतून साडेपंधरा लाख रुपयांचा अपहार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. संस्थेच्या बँक खात्यातून विनापरवानगी रक्कम काढल्याप्रकरणी संस्थेच्या लेखापालासह अन्य एकावर खालापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील स्वामीनारायण गुरुकुल संस्थेत लेखापाल असलेल्या हिरेन गोंदलिया आणि तन्मय छडीया (रा. गुजरात) या दोघांनी १५ लाख ५५ हजार ६०० रुपये रकमेचा अपहर केल्याची तक्रार संस्थेतर्फे खालापूर पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. यानुसार जुलै २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत संस्थेच्या बॅंक खात्यातून विनापरवानगी हिरेन आणि तन्मय यांनी या रकमेचा अपहर केला. याबाबतची माहिती संस्थेतील सुरज हातमोडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी संस्थेचे मुख्य संचालक असलेल्या हैदराबाद कार्यालयाला माहिती दिली. त्यानंतर संचालकांच्या सूचनेनुसार या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सध्या दोघेही जण फरार असून, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी जुंदरे पुढील तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.