मुंबई

महावितरणाच्या तेजश्रीवर शिवसेनेचे निवेदन

CD

वीज समस्येबाबत शिवसेनेचे निवेदन

उल्हासनगर (बातमीदार) : उल्हासनगर येथे वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या पुढाकाराने महावितरणचे मुख्य अभियंता चिंतामणी मिश्रा यांच्यासोबत कल्याण येथील ‘तेजश्री’ येथे नुकतीच बैठक झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला उल्हासनगर-४मध्ये वीज खंडित झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून, संबंधित अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. शहरातील नादुरुस्त ट्रान्स्फॉर्मर, पोल व वाहिन्यांची तातडीने दुरुस्ती, तक्रारींवर तत्काळ कार्यवाही आणि अपघात टाळण्यासाठी लटकलेल्या वायरची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली. उल्हासनगर-५ मधील वारंवार वीज खंडित होण्यामुळे लघुउद्योग व कामगारांना होणारा त्रास दूर करण्याचीही मागणी या वेळी करण्यात आली. बैठकीस शिवसेनेचे पदाधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jejuri Temple Incident : जेजुरी गडावर धक्कादायक घटना! भाविकांकडून पुजाऱ्याला मारहाण, नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhajinagar: कृषी पदवीच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशास सुरवात; राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत शिक्षणाची संधी; १२ जूनपर्यंत करता येणार अर्ज

एकेकाळी प्रफुल पटेलांचे PA ते आता राज्यसभेसाठी पक्षाकडून उमेदवारी, कोण आहेत राजेंद्र जैन?

Petrol-Diesel-CNG Price: LPG गॅस दरवाढीनंतर आज पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर! आता किती रुपये मोजावे लागणार?

Rahul Gandhi: मोदींना वाटते, युवकांनी भजी तळावीत: राहुल गांधी, सीबीएसई घोटाळा प्रकरण तापले

SCROLL FOR NEXT