पिंकी परिसर कचरामुक्त
केडीएमसीच्या ‘आयईसी’ टीमची प्रभावी स्वच्छता मोहीम
कल्याण, ता. १९ (बातमीदार) : कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका, पिंकी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून साचलेला कचरा अखेर हटवण्यात आला असून, नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. पूना लिंक रस्त्यालगत असलेल्या या भागात बेशिस्त नागरिकांसह काही व्यावसायिकांकडूनही मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात होता, त्यामुळे दुर्गंधी आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर केडीएमसीच्या ‘आयईसी’ टीमने महेश बनकर यांच्या पुढाकाराने विशेष जनजागृती व स्वच्छता मोहीम राबवली. पथकाने कचरा पूर्णपणे हटवून परिसर स्वच्छ धुतला. तसेच कचरा टाकण्याच्या ठिकाणी रांगोळी काढून ‘कचरा वेगवेगळा करूनच गाडीत द्या’ असे संदेश देत अनोख्या पद्धतीने जनजागृती केली.
विशेष म्हणजे, या ठिकाणाच्या मागे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे प्रचार कार्यालय असल्यानेही हा मुद्दा चर्चेत होता. सध्या परिसर स्वच्छ झाला असला तरी, कचरा गाडीच्या वेळा आणि स्वच्छता कायम राखण्याबाबत नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. आता ही स्वच्छता टिकवण्यासाठी नागरिक कितपत सहकार्य करतात, याकडे लक्ष लागले आहे.
-----------------
आता परिसर स्वच्छ केला असला तरी, नागरिकांच्या तक्रारी कायम आहेत. काहींनी कचरा गाडीच्या वेळेबाबत तक्रारी केल्या आहेत, तर काहींनी हे प्रयत्न कायमस्वरूपी असावेत, अशी मागणी केली आहे. आयईसी टीमने आपले काम चोख बजावले आहे. आता असे असले तरी पुढेही अशाच प्रकारे कारवाई व्हावी, अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.