मुंबई

स्टार्लिंग पक्ष्यांच्या आकाश नृत्याची नवी मुंबईकरांना भुरळ

CD

‘पळस मैना’च्या आकाश नृत्याची नवी मुंबईकरांना भुरळ
पक्षीप्रेमींसाठी पर्वणी
बेलापूर, ता. १९ (बातमीदार) ः समृद्ध अशा नवी मुंबई शहरात नोव्हेंबरपासूनच विविध स्थलांतरित, स्थानिक पक्ष्यांची रेलचेल पाहायला मिळते. विविध प्रजाती, आकाराच्या या पक्ष्यांमध्ये सध्या विशेष चर्चा आहे ती ‘रोझी स्टार्लिंग’ची. सद्यःस्थितीत नवी मुंबई, ठाणे क्रीक, उरण परिसरातील पाणथळ जागांवर रोझी स्टार्लिंग पक्षी हजारोंच्या संख्येने दिसत असून, त्यांच्या थव्यांचे मोहक आकाश नृत्य सध्या नवी मुंबईकरांना मोहून टाकत आहेत.
स्टार्लिंग पक्षी ज्याला मराठीत पळस मैना असे संबोधले जाते. हे पक्षी प्रामुख्याने पूर्व युरोप, पश्चिम आशिया आणि मध्य आशियातील (उदा. कझाकस्तान, उझबेकिस्तान) प्रदेशातून हिवाळी स्थलांतर करून भारतात येतात. पक्षी साधारणपणे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात भारतात दाखल होतात आणि एप्रिलपर्यंत येथे राहून मायदेशी परततात. सध्या नवी मुंबईतील टी.एस.चाणक्य, डीपीएस लेक, उरण, ठाणे क्रीक या परिसरात सकाळ-सायंकाळच्या वेळी हजारो स्टार्लिंग पक्ष्यांचे थवे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मायदेशी परतण्याच्या आधी साधारण एप्रिल महिन्यात स्टार्लिंग पक्षी आकाशात नेत्रदीपक दर्शन होते.

स्टार्लिंग पक्ष्यांचे मर्मरेशन
स्टार्लिंग पक्षी हजारोच्या संख्येने एकत्र येत आकाशात उंच भरारी घेत नृत्य सादर करतात. हजारो पक्षी एकमेकांशी टक्कर न होता, जणू एकाच जिवंत शरीराप्रमाणे हवेत वेगवेगळ्या आकृत्या (ढगांसारखे आकार, पक्षी आकार) तयार करतात. हे विहंगम दृश्य विशेषतः सूर्यास्ताच्या वेळी पाहायला मिळते, जेव्हा हे पक्षी रात्रीच्या मुक्कामासाठी एका ठिकाणी जमतात. त्यांच्या आकाशी एकत्रित नृत्याला मर्मरेशन म्हणतात. या समन्वित हालचालींमागे शिकार करणाऱ्या पक्ष्यांपासून (उदा. ससाणा) संरक्षण करणे आणि अन्नाचा शोध घेणे ही मुख्य कारणे असल्याचे पक्षी अभ्यासकांकडून सांगण्यात आले आहे.

नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरातील खाडीकिनारी असलेल्या खारफुटीच्या भागात यावर्षी रोझी स्टार्लिंगची मोठी संख्या दिसून आली आहे. या पक्ष्यांचा आवाज आणि त्यांचे हवेतील कलाबाजी पक्षीप्रेमींसाठी एक पर्वणी असते.
- विद्यासागर हरिहरन, पक्षी अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरे इच्छुक असतील तर पाठिंबा देणारच: आमदार रोहित पवार : एसआयआरच्या सॉफ्टवेअरमुळे मतदारांना फटका!

CSK चे टेन्शन आणखी वाढणार... आयुष म्हात्रे पुढचे सामने खेळणार की नाही? दुखापतीवर आले अपडेट

LPG Demand Drop India : देशात 'एलपीजी'ची मागणी घटली, वाढत्या दरांचा ग्राहकांवर ताण? नेमकं कारण काय...

Vaibhav Sooryavanshi: वैभवची IPLमधील वर्षपूर्ती! १५ वर्षीय फलंदाजाचे जगाला नोंद घ्यायला लावणारे १० दमदार कारनामे

आयुष म्हात्रेच्या दुखापतीबाबतीत CSK कडून निष्काळजीपणा... R Ashwin कडून कडाडून टीका

SCROLL FOR NEXT