मुंबई

महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसेनेचे काँग्रेसविरोधात आंदोलन

CD

महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेसविरोधात आंदोलन
तुर्भे, ता. २० (बातमीदार) : देशातील महिलांना संसद आणि राज्य विधानसभांमध्ये ३३ टक्के राजकीय आरक्षण मिळावे, या मागणीच्या समर्थनार्थ तसेच महिला आरक्षणाच्या प्रश्नावर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेच्या निषेधार्थ बेलापूर विधानसभा क्षेत्रातील शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शनिवारी (ता. १८) सीबीडी येथे आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख सरोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. या आंदोलनात सीबीडी महिला विभागप्रमुख दिपाली घोलप, उपजिल्हाप्रमुख मथुरा पाटील, उपशहर प्रमुख धनश्री विचारे, समाजसेविका सुनंदा बाविस्कर, समाजसेविका देवकी शिंदे तसेच महिला आघाडीच्या अनेक कार्यकर्त्या वं पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, तर उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील यांचे मार्गदर्शन आंदोलनाला लाभले.
या वेळी उपस्थित महिलांनी काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदविला. काँग्रेस मुर्दाबाद अशा घोषणा देत महिलांना राजकीय आरक्षण नाकारणाऱ्या काँग्रेसचा जाहीर निषेध करण्यात आला. तसेच, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या प्रतिमांना जोडे मारून संताप व्यक्त करण्यात आला.
आंदोलनादरम्यान महिला आरक्षण हा केवळ राजकीय मुद्दा नसून महिला सन्मान, महिला अधिकार आणि लोकशाही बळकटीकरणाचा प्रश्न असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. महिलांना केवळ आश्वासने नव्हे, तर प्रत्यक्ष प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, अशी ठाम भूमिका या वेळी मांडण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyan Bharatam Mission: ‘ज्ञानभारतम्’ मोहिमेतून जपली जाणार भारताची ज्ञानपरंपरा; संग्राहकांकडील एक कोटी हस्तलिखितांचा शोध घेणार, मौल्यवान वारसा होणार डिजिटल

Messi Vs Ronaldo: मेस्सीने विश्वचषक जिंकला, आता रोनाल्डोची पाळी? फुटबॉल चाहत्यांमध्ये रंगली नवी चर्चा

Buldhana: खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी बुलडाण्यात दाखल; आ. गायकवाड यांची प्रत्यक्ष पाहणी; पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन

Jejuri Temple Incident : जेजुरी गडावर धक्कादायक घटना! भाविकांकडून पुजाऱ्याला मारहाण, नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhajinagar: कृषी पदवीच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशास सुरवात; राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत शिक्षणाची संधी; १२ जूनपर्यंत करता येणार अर्ज

SCROLL FOR NEXT