मुंबई

वाशीतील ''सत्रा प्लाझा''मध्ये देहविक्रय रॅकेटचा पर्दाफाश

CD

वाशीतील सत्रा प्लाझामध्ये देहविक्रय रॅकेटचा पर्दाफाश
१७ वर्षीय अल्पवयीन मुलीसह तिघींची सुटका, महिला दलाल जेरबंद
नवी मुंबई, ता. १९ (वार्ताहर) : वाशी येथील सत्रा प्लाझा व्यापारी संकुलातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा एपीएमसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसह अन्य दोन महिलांची सुटका करण्यात आली असून, रॅकेट चालवणाऱ्या सुजाता राठोड (३६) या महिला दलालास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
वाशीतील सत्रा प्लाझा या व्यापारी संकुलामध्ये अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेण्यात येत असल्याची माहिती परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांना मिळाली होती. त्यानुसार डहाणे यांनी याठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एपीएमसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने एका बनावट ग्राहकाद्वारे महिला दलालाशी संपर्क साधला. या व्यवहारासाठी २५ हजार रुपयांचा सौदा ठरवला होता. त्यानंतर गुरुवारी (ता. १६) पोलिसांच्या पथकाने सत्र प्लाझामधील जिमीस बर्गरच्या परिसरातील हॉटेलमध्ये धाड टाकली. यावेळी जिमीस बर्गरमध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसह इतर महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. यातील एक महिला वाशीतील एका स्पा सेंटरमध्ये कामाला असल्याची माहिती समोर आली आहे.
ही यशस्वी कारवाई वपोनि अजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश मांडवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश पाटील आणि त्यांच्या पथकाने केली आहे. या रॅकेटमध्ये अजून कुणाचे धागेदोरे गुंतलेले आहेत का, याचा अधिक तपास एपीएमसी पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Record Broken! पंजाब किंग्सने नोंदवली IPL 2026 मधील सर्वोच्च धावसंख्या; प्रियांश आर्य, कूपर कॉनलीसह सारेच लखनौच्या गोलंदाजांवर तुटून पडले...

Latur Missing Kids Case: लातूर हादरलं! दोन चुलत भावंडं बेपत्ता; सहा वर्षीय देवांशचा मृतदेह सापडला, साईचरणचा अद्याप शोध सुरू

PBKS vs LSG Live: १२ चौकार, १६ षटकार... प्रियांश आर्य, कूपर कॉनली यांचे शतक थोडक्यात हुकले, संजीव गोएंका यांनी मानले देवाचे आभार...

PBKS vs LSG Live: मॅच फिरली... रिषभ पंतची 'चूक' महागात पडतेय; मिचेल मार्शचं ऐकलं नाही, आता भोगा कर्माची फळं... फलंदाज धु धु धूतायेत

रहस्य, थरार आणि अंधश्रद्धेची प्रभावी गुंफण, कसा आहे पूजा सावंतचा ‘सालबर्डी?

SCROLL FOR NEXT