मुंबई

भीम गीताला रसिकांची पसंती

CD

भीमगीताला रसिकांची पसंती

मुरबाड (वार्ताहर) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त स्वर सारंग प्रस्तुत ‘वंदन करण्या भीमरायाला साऱ्यांची लगबग झाली’ हे गायक संजय घुडे यांनी स्वरबद्ध केलेले भीमगीत महाराष्ट्रात घराघरात वाजत आहे. संजय घुडे हे महामार्ग पोलिस दलातील मदत केंद्रात माळशेज येथे कार्यरत असून, ते आपली नोकरी सांभाळून अनेक सामाजिक कार्यांत सहभाग घेत असतात. प्राणिमित्र म्हणून तसेच एक भजनी कलावंत म्हणून जनसामान्यांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करून नि:स्वार्थपणे ते सेवा करीत असतात. सतत मेहनत करून त्यांनी एमए एलएलएम सुगम संगीत तसेच इतर पदव्या पुणे व मुंबई विद्यापीठातून मिळविल्या आहेत. बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित अनेक भीमगीते सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेली आहेत. ‘वंदन करण्या भीमरायाला साऱ्यांची लगबग झाली’ हे गीत महेशकुमार धानके यांनी रचले असून, गायन व संगीत संजय घुडे यांनी केले आहे. मुरबाड येथील आर. जी. म्युझिक स्टुडिओचे रुपेश गोंधळी यांनी संगीत संयोजन केले असून, जय कैलास मनोरे यांनी व्हिडिओग्राफी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Record Broken! पंजाब किंग्सने नोंदवली IPL 2026 मधील सर्वोच्च धावसंख्या; प्रियांश आर्य, कूपर कॉनलीसह सारेच लखनौच्या गोलंदाजांवर तुटून पडले...

Latur Missing Kids Case: लातूर हादरलं! दोन चुलत भावंडं बेपत्ता; सहा वर्षीय देवांशचा मृतदेह सापडला, साईचरणचा अद्याप शोध सुरू

PBKS vs LSG Live: १२ चौकार, १६ षटकार... प्रियांश आर्य, कूपर कॉनली यांचे शतक थोडक्यात हुकले, संजीव गोएंका यांनी मानले देवाचे आभार...

PBKS vs LSG Live: मॅच फिरली... रिषभ पंतची 'चूक' महागात पडतेय; मिचेल मार्शचं ऐकलं नाही, आता भोगा कर्माची फळं... फलंदाज धु धु धूतायेत

रहस्य, थरार आणि अंधश्रद्धेची प्रभावी गुंफण, कसा आहे पूजा सावंतचा ‘सालबर्डी?

SCROLL FOR NEXT