स्वच्छ मिरा-भाईंदरचा संकल्प
विविध ठिकाणांची आयुक्तांकडून पाहणी
भाईंदर, ता. २० (बातमीदार) : मिरा-भाईंदर पालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात देशात चांगली कामगिरी केली आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा दर्जा उंचावण्यासाठी आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी शहर स्वच्छतेची नुकतीच पाहणी केली.
स्वच्छ सर्वेक्षणात देशात चांगली कामगिरी करणाऱ्या मिरा-भाईंदर महापालिकेसमोर विविध आव्हाने आहेत. याच अनुषंगाने पालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत आयुक्तांनी मिरा रोड रेल्वे स्थानक परिसर, जॉगर्स पार्क, हिंदू स्मशानभूमी नाला, सृष्टी परिसर, जरीमरी तलाव परिसरातील कचरा व्यवस्थापन, नालेसफाई, सार्वजनिक सुविधांचा आयुक्तांनी आढावा घेतला. या वेळी अस्वच्छता पसरवणाऱ्या संबंधितांवर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले. तसेच अतिक्रमणे हटवून सार्वजनिक जागा मोकळ्या ठेवणे, कचरा संकलन, कचऱ्याचे वर्गीकरण प्रभावी करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
-----------------------
मिरा-भाईंदर पालिका स्वच्छ सर्वेक्षणात चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे, पण प्रशासनासोबत नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे.
- राधाबिनोद शर्मा, आयुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.