मुंबई

रोहा शहराच्या विकासकामांना गती देणार : ना. अदिती तटकरे

CD

रोहा शहराच्या विकासकामांना गती देणार : अदिती तटकरे
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश; मंत्रालयात आढावा बैठक
रोहा, ता. १९ (बातमीदार) : महायुती सरकारच्या माध्यमातून आणि खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नांतून श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध होत असून, रोहा शहराच्या विकासकामांना गती देण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
रोहा शहरातील विविध विकास प्रकल्प व प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात गुरुवारी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत रोहा-कोलाड मार्गावरील गटारांचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच या मार्गावरील वाहतुकीस अडथळा ठरणारे अनावश्यक विद्युत खांब हटवण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
अष्टमी येथील स्लॅब ड्रेनचे काम दीर्घकाळ प्रलंबित असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे कामही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीला नगराध्यक्षा वनश्री समीर शेडगे, मुख्याधिकारी अजयकुमार एडके, समिती सभापती निता हजारे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

चौकट
प्रलंबित कामांवर विशेष भर
प्रशासकीय अडचणी दूर करून सर्व विकासकामे जलद गतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले. नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, हा शासनाचा उद्देश असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Record Broken! पंजाब किंग्सने नोंदवली IPL 2026 मधील सर्वोच्च धावसंख्या; प्रियांश आर्य, कूपर कॉनलीसह सारेच लखनौच्या गोलंदाजांवर तुटून पडले...

Latur Missing Kids Case: लातूर हादरलं! दोन चुलत भावंडं बेपत्ता; सहा वर्षीय देवांशचा मृतदेह सापडला, साईचरणचा अद्याप शोध सुरू

PBKS vs LSG Live: १२ चौकार, १६ षटकार... प्रियांश आर्य, कूपर कॉनली यांचे शतक थोडक्यात हुकले, संजीव गोएंका यांनी मानले देवाचे आभार...

PBKS vs LSG Live: मॅच फिरली... रिषभ पंतची 'चूक' महागात पडतेय; मिचेल मार्शचं ऐकलं नाही, आता भोगा कर्माची फळं... फलंदाज धु धु धूतायेत

रहस्य, थरार आणि अंधश्रद्धेची प्रभावी गुंफण, कसा आहे पूजा सावंतचा ‘सालबर्डी?

SCROLL FOR NEXT