मुंबई

पाणी पुरवठ्यात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसविण्याचा महापौरांचा इशारा

CD

पाणीटंचाईवर महापौरांचा कारवाईचा इशारा

कल्याण, ता. १९ (वार्ताहर) : पाणीपुरवठ्यात निष्काळजी करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसविण्याचा इशारा कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर हर्षाली चौधरी यांनी दिला आहे. मोहिली पंपहाउसवर महापौरांनी अचानक भेट देत येथील कामचुकार अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.

कल्याण-डोंबिवलीकरांच्या घशाला पडलेली कोरड आता प्रशासकीय पातळीवर गंभीर वळण घेत आहे. शहरात वाढत्या पाणीटंचाईमुळे नागरिकांमध्ये संताप असतानाच, महापौर हर्षाली चौधरी यांनी थेट स्थानिक पातळीवर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. महापौरांनी ‘अ’ प्रभागातील मोहिली पंपहाउसवर अचानक भेट देऊन पाहणी केली. कामात होत असलेली दिरंगाई आणि कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा पाहून महापौरांनी अधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचले असून, पाण्यासाठी वणवण करणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी कडक आदेश दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात पाण्याचा प्रश्न उग्र रूप धारण करत आहे. अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणे किंवा पाणीच न मिळणे अशा तक्रारींचा पाऊस पडत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर हर्षाली चौधरी यांनी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय मोहिली पंपहाउसला भेट दिली. महापौरांनी जेव्हा पंपहाउसमध्ये प्रवेश केला, तेव्हा तेथील यंत्रणा आणि कामाची संथ गती पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या ववेळी त्यांनी संबंधित अभियंता आणि कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून तांत्रिक अडचणी समजून घेतल्या.
---------------
महापौरांचा आक्रमक पवित्रा
तांत्रिक कारणांपेक्षा मानवी दिरंगाईमुळे पाणीपुरवठा विस्कळित होत असल्याचे दिसून आल्यावर महापौरांनी आक्रमक पवित्रा घेतला. पाहणीदरम्यान महापौरांनी अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली. या वेळी कामचुकारपणा खपवून घेणार नाही. कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले. याबरोबर कोणत्या प्रभागात किती पाणी जाते आणि कुठे कमतरता आहे, याचे चोख नियोजन सादर करण्याचे आदेश दिले. तसेच पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ नागरिकांवर येऊ देऊ नका, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: शशांक सिंगने दोन सोपे झेल टाकले; अर्शदीप भडकला, पाँटिंग तापला... श्रेयस अय्यरने काय केले ते पाहा Video Viral

तन्वी कोलते ठरली 'Bigg Boss Marathi 6' ची महाविजेती, राकेशचं स्वप्न राहिलं अपूरं

IPL 2026 Point Table: अपराजित पंजाब किंग्स! अव्वल स्थानावरील पकड मजबूत; लखनौ सुपर जायंट्सची अवस्था काय? पाहा गुणतालिका

US-Iran War: डील करा नाहीतर...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, संघर्षात निर्णायक टप्पा जवळ?

Akshaya Tritiya Gold Price : अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक, खरेदीही मोठ्या उत्साहात; २०,००० कोटींच्या विक्रीचा अंदाज

SCROLL FOR NEXT