मुंबई

रायगड पोलिसांना बॅरिकेडस् व ब्रेथ ॲनॉलायझर वाटप

CD

रायगड पोलिसांना बॅरिकेड्स व ब्रेथ ॲनालायझर वाटप
धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे वाहतूक नियमन व अपघात नियंत्रणासाठी महत्त्वाची मदत
अलिबाग, ता. १९ (वार्ताहर) : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने रायगड जिल्हा पोलीस विभागास ६१५ बॅरिकेड्स व १६ श्वासातील मद्य तपासणी यंत्र वाटप करण्यात आले. शुक्रवारी (ता.१७) रायगड पोलिस मुख्यालयात प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ. सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी व राहुल धर्माधिकारी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडे ही सामग्री सुपूर्द केली.
यापूर्वीही पोलिस कल्याण निधीसाठी प्रतिष्ठानतर्फे पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली होती. या योगदानाबद्दल पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी प्रतिष्ठानचे आभार मानले.
जिल्ह्यातील वाहतूक नियमनासाठी हे बॅरिकेड्स उपयुक्त ठरणार असून, अपघात नियंत्रणासाठी श्वासातील मद्य तपासणी यंत्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ही मशिन्स जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांना वितरित करण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठरलं! तीन आठवडे चालणार यंदाचं पावसाळी अधिवेशन, २२ जूनपासून होणार सुरुवात, कोणते मुद्दे राहणार चर्चेत?

Video : युझवेंद्र चहलचे २९ चेंडूंत शतक! पीटरसनने दिलेलं चॅलेंज २१ चेंडू राखून पूर्ण केलं, पण त्यात Twist आहे... ; मोडला एबीचा विक्रम

पाकिस्तानी हवाई दलाचं विमान कोसळलं, २ पायलटचा मृत्यू; घटना CCTVत कैद

Latest Marathi News Live Update : वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांची टीका

Sanchita Ugale: छावा चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्रीने संपवलं जीवन, नालासोपाऱ्यातील राहत्या घरात आढळला मृतदेह; DDLJ मध्येही काम केलं होतं

SCROLL FOR NEXT