मुंबई

जागतिक वारसा दिनी उलगडला ‘बहुसांस्कृतिक ठाणे’चा इतिहास

CD

जागतिक वारसादिनी उलगडला ‘बहुसांस्कृतिक ठाणे’चा इतिहास
- जिल्हा प्रशासनाकडून अनोखा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १९ : प्राचीन इतिहास, धार्मिक विविधता आणि सांस्कृतिक वारशाचा समृद्ध ठेवा लाभलेल्या ठाणे शहराने काळानुसार अनेक परिवर्तनांचा साक्षीदार राहून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशातच शनिवारी जागतिक वारसादिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या ‘बहुसांस्कृतिक ठाणे’ हेरिटेज वॉकमध्ये पुन्हा एकदा ठाणे शहरातील संस्कृतीचे, वारसा, मंदिरे ते टाऊन हॉलच्या इतिहासाचा उलगडा या निमित्ताने करण्यात आला.

जागतिक वारसादिनाच्या निमित्ताने ठाण्यातील ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व असलेल्या वास्तूंना भेट देत, त्याची माहिती जाणून घेत, ती ठाणेकरांपार्यंत पोहोचावी, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रूपाली भालके यांच्या संकल्पनेतून हेरिटेज वॉक या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वॉकची सुरुवात सुप्रसिद्ध पुरातन कोपिनेश्वर मंदिरापासून करण्यात आली, त्यानंतर मासुंदा तलाव, सेंट जॉन बाप्टिस्ट चर्च, पारसी सिनेगॉग, जैन मंदिर, मुस्लिम धर्मियांचे सामाजिक भवन या ठिकाणी भेट देऊन शेवटी समारोप टाऊन हॉल येथे करण्यात आला.

या वेळी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपजिल्हाधिकारी शशिकांत गायकवाड, कल्याण प्रांताधिकारी विश्वास गुजर, तहसीलदार सचिन चौधर,जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्वला सपकाळे, तहसीलदार अमोल कदम, उमेश पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अनिता जवंजाळ, ठाणे मनपा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक गिरीश काळे, आर्किऑलॉजिस्ट गौरी काळे, जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या अद्वैता मांगले, क्रीडा मार्गदर्शक श्रद्धा तळेकर हे अधिकारी सहभागी झाले होते. या हेरिटेज वॉक दरम्यान संदेश अवडण यांनी मार्गदर्शकाची भूमिका चोखपणे बजावली. तर, हेरिटेज वॉकचे नियोजन अश्वमेध प्रतिष्ठानचे संस्थापक, पुरातत्त्व अभ्यासक व महाराष्ट्र राज्याचे मानद वन्यजीव संरक्षक अविनाश हरड यांनी केले होते.

------------
विविधतेने नटलेल्या वारशाचा अनुभव
कोपिनेश्वर मंदिरापासून टाऊन हॉलपर्यंतच्या या ऐतिहासिक फेरीत सहभागी झालेल्यांनी सेंट जॉन चर्च, पारशी अग्निमंदिर, ज्यू सभास्थान (सिनगॉग), जैन मंदिर अशा विविध धर्मांच्या वास्तूंना भेट देत ठाण्याच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या वारशाचा जवळून अनुभव घेतला. प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकांनी मिळून जुन्या वास्तूंचा इतिहास जाणून घेत हा अनोखा वारसा जपण्याचा संदेश दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: शशांक सिंगने दोन सोपे झेल टाकले; अर्शदीप भडकला, पाँटिंग तापला... श्रेयस अय्यरने काय केले ते पाहा Video Viral

तन्वी कोलते ठरली 'Bigg Boss Marathi 6' ची महाविजेती, राकेशचं स्वप्न राहिलं अपूरं

IPL 2026 Point Table: अपराजित पंजाब किंग्स! अव्वल स्थानावरील पकड मजबूत; लखनौ सुपर जायंट्सची अवस्था काय? पाहा गुणतालिका

US-Iran War: डील करा नाहीतर...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, संघर्षात निर्णायक टप्पा जवळ?

Akshaya Tritiya Gold Price : अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक, खरेदीही मोठ्या उत्साहात; २०,००० कोटींच्या विक्रीचा अंदाज

SCROLL FOR NEXT