मुंबई

उरण नगरपरिषदेचे लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे कर्मचारी त्रस्त

CD

उरण नगर परिषदेचे कर्मचारी लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे त्रस्त
सामूहिक बदलीसाठी प्रशासकाकडे साकडे
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १९ : उरण नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि त्यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय कामात सातत्याने हस्तक्षेप होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. नगराध्यक्ष व काही पदाधिकारी यांच्या दडपशाही आणि मनमानी कारभाराला कंटाळून नगर परिषदेतील सर्व संवर्ग अधिकारी आणि राज्यस्तरीय अधिकाऱ्यांनी आपली अन्यत्र बदली करण्यात यावी, अशी मागणी वरिष्ठ प्राधिकाऱ्यांना केली आहे.
नगर परिषदेत राजकीय मतभेद टोकाला पोहोचले असून, त्याचा नाहक त्रास प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला जात आहे. संवर्ग कर्मचाऱ्यांविरुद्ध वरिष्ठ कार्यालयात जाणीवपूर्वक तथ्यहीन आणि खोट्या तक्रारी करून त्यांच्यावर मानसिक दबाव आणला जात आहे. यात एका निलंबित कर्मचाऱ्याच्या प्रभावाखाली राजकीय लोकप्रतिनिधी आणि सत्ताधारी हे कृत्य करत असल्याची नगर परिषदेमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे. सत्ताधाऱ्यांच्या या हस्तक्षेपामुळे अधिकाऱ्यांचे मनोबल खच्ची झाले आहे. याचा थेट परिणाम शहराच्या विकासकामांवर आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवांवर होत आहे. आम्ही मानसिक तणावाखाली आहोत, आमचे कौटुंबिक आयुष्य विस्कळित होत आहे, अशा शब्दांत अधिकाऱ्यांनी विशेषतः महिला अधिकाऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत. उरण नगर परिषदेतील सध्याची परिस्थिती पाहता, येथे काम करणे कठीण झाले असल्याचे सांगत, सर्व राज्यस्तरीय संवर्ग अधिकाऱ्यांनी आपली बदली करावी, अशी विनंती नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडे केली आहे. आता यावर वरिष्ठ प्रशासन काय पाऊल उचलते आणि सत्ताधाऱ्यांच्या या कार्यपद्धतीवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Record Broken! पंजाब किंग्सने नोंदवली IPL 2026 मधील सर्वोच्च धावसंख्या; प्रियांश आर्य, कूपर कॉनलीसह सारेच लखनौच्या गोलंदाजांवर तुटून पडले...

Latur Missing Kids Case: लातूर हादरलं! दोन चुलत भावंडं बेपत्ता; सहा वर्षीय देवांशचा मृतदेह सापडला, साईचरणचा अद्याप शोध सुरू

PBKS vs LSG Live: १२ चौकार, १६ षटकार... प्रियांश आर्य, कूपर कॉनली यांचे शतक थोडक्यात हुकले, संजीव गोएंका यांनी मानले देवाचे आभार...

PBKS vs LSG Live: मॅच फिरली... रिषभ पंतची 'चूक' महागात पडतेय; मिचेल मार्शचं ऐकलं नाही, आता भोगा कर्माची फळं... फलंदाज धु धु धूतायेत

रहस्य, थरार आणि अंधश्रद्धेची प्रभावी गुंफण, कसा आहे पूजा सावंतचा ‘सालबर्डी?

SCROLL FOR NEXT