मुंबई

रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षणाचा निधी लंपास

CD

शहापूर, ता. १९ (वार्ताहर) : आदिवासी विकास विभागांतर्गत शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत युवक, युवतींसाठी राबविण्यात येणाऱ्या रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षणात घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची बनावट उपस्थिती नोंदवणे, प्रणालीमध्ये छेडछाड करणे आणि नियमबाह्य पद्धतीने प्रशिक्षण देत सरकारच्या लाखो रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नेमणूक केलेल्या संस्थेविरोधात शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने प्रशिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश झाला आहे.

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या वतीने राज्यभरातील १८ ते ४५ वयोगटातील आदिवासी युवक, युवतींना रोजगारभिमूख कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी ठाणे येथील गौशिक टेक्नॉलॉजी एलएलपी या संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला होता. आदिवासी विकास विभागाच्या निवासी वसतिगृहातील आदिवासी जमातीचे एकूण ११ मुले व ४९ मुली असे ६० विद्यार्थी समाविष्ट होते. या प्रशिक्षणाबाबत झालेल्या विविध तक्रारीनुसार चौकशीसाठी एक समिती स्थापित करण्यात आली होती. त्या समितीच्या अहवालानुसार विद्यार्थ्यांना ५७ दिवसांचे निवासी प्रशिक्षण देणे अपेक्षित होते, मात्र फक्त पाच दिवस प्रशिक्षण देण्यात आले असून प्रत्यक्षात आठवड्यातून केवळ एकदाच फक्त रविवारी मर्यादित वेळेत प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमाच्या संगणकीय प्रणालीमध्ये छेडछाड करून प्रशिक्षणार्थ्यांची बनावट उपस्थिती नोंदवण्यात आली. तसेच अधिकृत परवानगी नसलेल्या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आले.

याप्रकरणी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या आदेशानुसार नाशिक येथील शाखा व्यवस्थापक राजेश पवार यांनी शहापूर पोलिस ठाण्यात येऊन दिलेल्या तक्रारीनंतर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या गौशिक टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकीय भागीदार तुळशीदास शरद मांजरेकर यांच्यासह संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.

प्रशिक्षणार्थ्यांची खोटी उपस्थिती
विशेष म्हणजे प्रशिक्षण न देता केवळ सामान्य विषयांवर वेळ घालवण्यात आल्याचेही उघड झाले. या प्रकरणात ६० प्रशिक्षणार्थ्यांची खोटी उपस्थिती दाखवून सरकारकडून सुमारे आठ लाख १५ हजार ८८० रुपये घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Fireworks Factory Blast : तामिळनाडूत मोठी दुर्घटना; फटाका कारखान्यात भीषण स्फोट, १६ ठार, ६ गंभीर जखमी

RR vs KKR Live: ध्रुव जुरेलची भन्नाट स्टम्पिंग... कॅमेरून ग्रीन अम्पायरचा निर्णय येण्यापूर्वीच मैदानाबाहेर गेला... अशी चपळता क्वचितच पाहिली असेल Video

Pune Traffic: पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! नियम मोडणाऱ्यांना स्वयंचलित चलन पाठवणार, वाहतूक नियमभंगावर डिजिटल चाप..

SRH vs CSK: ए गप्प बसा... चेन्नईला पराभूत केल्यानंतर काव्या मारनच्या 'Silence' सेलिब्रेशनची चर्चा; Video Viral

iPhone 17e ची भारतात धमाकेदार एन्ट्री! मिळतायत Pro वाले फीचर्स; किंमत एवढी कमी, एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT