उल्हासनगर, ता. १९ (बातमीदार) : शहरातील मंदिरांनाही आता चोरट्यांनी लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या बाबा मंगत राम कुटिया येथे सलग दोन रात्री दानपेटी फोडून हजारोंची चोरी करण्यात आली आहे.
ही घटना उल्हासनगर कॅम्प क्रमांक ३ मधील मुख्य रस्त्यावर घडली असून, चोरट्यांनी अतिशय निर्भयपणे ही चोरी केली. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथून अवघ्या एका मिनिटाच्या अंतरावर डीसीपी कार्यालय आणि सेंट्रल पोलिस ठाणे आहे. तसेच समोरच टाऊन हॉलही आहे. शुक्रवारी (ता. १७) रात्री एक महिला आणि एक व्यक्ती कुटियामध्ये प्रवेश करतात. त्यानंतर शनिवारी (ता. १८) आणखी एक चोर दानपेटी फोडून आरामात चोरी करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
मंदिर ट्रस्टने या घटनेनंतर सेंट्रल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, वरिष्ठ निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. मात्र, या घटनेमुळे सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की, जेव्हा पोलिस ठाण्याच्या अगदी जवळच चोर इतक्या सहजपणे चोरी करू शकतात, तेव्हा शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.