मुंबई

गुटखा आणि तंबाखूजन्य साठ्यावर कारवाई

CD

तंबाखूजन्य साठ्यावर कारवाई
उल्हासनगर, ता. १९ (वार्ताहर) ः शहरात बंदी घातलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध साठ्यावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. यात सुमारे पाच लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला. शहाड फाटक परिसरातील गोदामावर टाकलेल्या छाप्यात एकाला अटक करण्यात आली असून, दोन जण फरार आहेत.
ठाणे अन्न व औषध प्रशासनाने शहाड फाटक परिसरात छापा टाकत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा सुमारे पाच लाख पाच हजार रुपयांचा साठा जप्त केला. अन्न सुरक्षा अधिकारी रणजित माने यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. संबंधित ठिकाणी अरबाज तशीर खान, लोकेश बजाज आणि मनीष यादव हे अवैधरीत्या गुटखा व पानमसाला विक्री करीत असल्याचे उघड झाले. पथकाने छापा टाकत मोठ्या प्रमाणात साठा जप्त केला. तसेच अरबाज खानला ताब्यात घेतले. इतर दोन आरोपी फरार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्याची सुट्टी! कर्णधारपद अन् संघातली जागाही जाणार, टी२०चा 'नवा बॉस' कोण?

OBC कार्ड खेळत काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक! बी. के. हरिप्रसाद बनले कर्नाटक काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष; डी. के. शिवकुमारांची जागा घेणार, सतीश जारकीहोळींचा पत्ता कट!

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी वाचा एका क्लिकवर!

T20 Mumbai Women's league मध्ये फाल्कन्सच्या विजयात भारतीय स्टार सायली सातघरे अन् १४ वर्षीय स्वरा जाधव चमकली

Burning ST Bus : चांदवडजवळ ‘बर्निंग बस’चा थरार! चालक-वाहकांच्या प्रसंगावधानामुळे ५४ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT