मुंबई

विळे वरचीवाडी येथे पाणपोई सुरू

CD

विळे वरची वाडी येथे पाणपोई सुरू
प्रवासी, नागरिकांना उष्णतेत दिलासा
माणगाव, ता. १९ (वार्ताहर)ः वाढत्या उन्हाच्या तीव्र झळांमुळे सामान्य नागरिक व प्रवाशांचे हाल होत असताना विळे वरची वाडी रिक्षा स्टॅन्ड, भिरा-कोलाड नाका येथे शुक्रवारी (ता.१७) पाणपोईची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमामुळे प्रवासात असलेल्या नागरिकांना आणि स्थानिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ही पाणपोई सामाजिक बांधिलकी जपत कुमार सिद्धेश देवेंद्र पाबेकर यांच्या सौजन्याने सुरू करण्यात आली. महिला आघाडीच्या विभागीय अध्यक्षा देविकाताई पाबेकर यांच्या हस्ते पाणपोईचे उद्‍घाटन करण्यात आले.
या वेळी ज्येष्ठ नेते महादेव ताम्हणकर, माजी उपसरपंच शाम तवटे, संतोष बामणे, विले विभागाचे सचिव प्रवीण सावंत तसेच प्रमोद लाड यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करीत समाजासाठी अशा उपक्रमांची आजच्या काळात अत्यंत गरज असल्याचे मत व्यक्त केले.
सध्या तापमानात झपाट्याने वाढ होत असून, दुपारच्या वेळेत प्रवास करणाऱ्या रिक्षाचालक, कामगार, विद्यार्थी व नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेली ही पाणपोई केवळ पाण्याची सोय नसून, मानवतेचा ओलावा जपणारा एक संवेदनशील उपक्रम ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Record Broken! पंजाब किंग्सने नोंदवली IPL 2026 मधील सर्वोच्च धावसंख्या; प्रियांश आर्य, कूपर कॉनलीसह सारेच लखनौच्या गोलंदाजांवर तुटून पडले...

Latur Missing Kids Case: लातूर हादरलं! दोन चुलत भावंडं बेपत्ता; सहा वर्षीय देवांशचा मृतदेह सापडला, साईचरणचा अद्याप शोध सुरू

PBKS vs LSG Live: १२ चौकार, १६ षटकार... प्रियांश आर्य, कूपर कॉनली यांचे शतक थोडक्यात हुकले, संजीव गोएंका यांनी मानले देवाचे आभार...

PBKS vs LSG Live: मॅच फिरली... रिषभ पंतची 'चूक' महागात पडतेय; मिचेल मार्शचं ऐकलं नाही, आता भोगा कर्माची फळं... फलंदाज धु धु धूतायेत

रहस्य, थरार आणि अंधश्रद्धेची प्रभावी गुंफण, कसा आहे पूजा सावंतचा ‘सालबर्डी?

SCROLL FOR NEXT