मुंबई

नवी मुंबईत नालेसफाईवर ड्रोन वॉच

CD

नवी मुंबईत नालेसफाईवर ड्रोन वॉच
सोशल ऑडिटमुळे प्रशासनावर नजर
नवी मुंबई, ता. १९ (वार्ताहर) : पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या नालेसफाईतील संभाव्य भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सजग नागरिक मंचाने यंदा अनोखा सोशल ऑडिट उपक्रम राबवला आहे. मंचाच्या कार्यकर्त्यांनी १० एप्रिल २०२६ रोजी शहरातील विविध नाल्यांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून प्रत्यक्ष स्थितीचे चित्रीकरण केले. या पाहणीत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला तसेच झाडेझुडपे वाढलेली आढळली, ज्यामुळे प्रशासनाच्या वर्षभर नालेसफाईच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मागील वर्षी बेलापूर विभागातील पाच नाल्यांमधून ६०४३ घनमीटर गाळ काढल्याचा दावा करत ५९.५४ लाख रुपये खर्च दाखवण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात एवढ्या प्रमाणात गाळ काढल्याचे ठोस पुरावे आढळले नसल्याचा आरोप मंचाने केला आहे. यावर्षी अशीच आर्थिक अनागोंदी टाळण्यासाठी कामापूर्वी आणि नंतरच्या स्थितीची पडताळणी ड्रोन फुटेजच्या आधारे केली जाणार आहे.
मंचाच्या सदस्या त्रिशीला कांबळे यांनी मुख्यमंत्री, महापालिका आयुक्त, एसीबी आणि लोकायुक्तांकडे निवेदन देत पारदर्शकतेसाठी विविध उपाय सुचवले आहेत.

कोट
नालेसफाई ही केवळ प्रक्रिया नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित बाब आहे. यंदा ‘नालेसफाई नव्हे तिजोरी सफाई’ अशी प्रतिमा निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणावी.
- संदीप ठाकूर, कायदेशीर सल्लागार, सजग नागरिक मंच

चौकट
ड्रोनद्वारे पारदर्शकता आणि पडताळणी
नालेसफाईपूर्वी आणि नंतर ड्रोन सर्वेक्षण करून प्रत्यक्ष कामाची तुलना केली जाणार आहे. यामुळे कागदोपत्री आकडे आणि प्रत्यक्ष कामातील तफावत उघड होण्यास मदत होईल.

बॉक्स
भ्रष्टाचार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना
गाळाचे वैज्ञानिक मोजमाप, जीपीएस ट्रक ट्रॅकिंग, व्हिडिओ चित्रीकरण आणि गैरव्यवहार करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई या मागण्यांमुळे प्रशासनावर जबाबदारी निश्चित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Candidate: नवनीत राणा, छगन भुजबळ चर्चेत; पण राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा वेगळाच मास्टरस्ट्रोक! अखेर नाव जाहीर, कुणाला दिली संधी?

Raigad Traffic: पालीकरांना मोठा दिलासा! शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय..

World Yogasana Championships: भारताचे निर्विवाद वर्चस्व! तब्बल २२ सुवर्णपदकांसह यजमान संघाचे अव्वल स्थान कायम

Video: Shreyas Iyer ची भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला, 'ही भावना खूपच...'

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT