मुंबई

बाजार समिती फळ बाजारात स्लॅब कोसळला;

CD

बाजार समिती फळ बाजारात स्लॅब कोसळला
कामगार आणि ग्राहक जखमी
जुईनगर, ता. १९ (बातमीदार) : नवी मुंबईतील वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारात शनिवारी (ता. १९) मोठी दुर्घटना घडली. ऐन गर्दीच्या वेळी फळ बाजारातील अचानक स्लॅब कोसळल्याने एक कामगार आणि एक ग्राहक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे बाजार आवारात खळबळ उडाली असून, व्यापाऱ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मुंबई फळ बाजारतील एच विंगमधील गाळा क्रमांक ६९७ च्या समोर अचानक स्लॅब कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एक कामगार आणि एक ग्राहक जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी फळ बाजार उपसचिवांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, गाळा क्रमांक ६९७ पॅसेज पूर्णपणे जीर्ण अवस्थेत असून, पुणे येथील पणन संचालकांनी दुरुस्तीसाठी सुमारे दीड वर्षांपूर्वी मंजुरी दिली होती. तरीही प्रत्यक्ष काम का सुरू झाले नसल्याने व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे स्लॅब कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Alert: मुंबईत ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा २४ वेळा धडकणार! सर्वात मोठी भरती कधी येणार? मान्सूनसोबत हाय टाइडचाही धोका

Indian Visa Regulations: परदेशी नागरिकांसाठी भारताचे व्हिसा नियम बदलले; एका चुकीमुळे होऊ शकते मोठी कारवाई!

Pune Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची माघार; 'या' कारणामुळे घेतला निर्णय

मच्छिंद्र कांबळी यांचं अजरामर 'वस्त्रहरण' नाटक पुन्हा भेटीला येणार; 'हा' कसलेला अभिनेता साकारणार तात्या सरपंच

Latest Marathi News Live Update : जय प्रकाश गांधी यांना 'भारतमला महामार्ग भूसंपादन नुकसानभरपाई घोटाळा' प्रकरणात अटक

SCROLL FOR NEXT