कल्याण-डोंबिवलीकरांच्या दारी गार्नियरची ‘कलर कार’
डोंबिवली, ता. १९ : केसांच्या रंगासाठी ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या गार्नियर कंपनीने ‘कलर कार’ या अभिनव मोहिमेद्वारे पुन्हा एकदा महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या सहकार्याने राबविण्यात येणारी ही मोहीम ग्राहकांपर्यंत थेट पोहोचत संवाद साधण्यावर भर देत आहे.
सध्या हेअर कलरिंगमध्ये हायलाइट्स, टच-अप आणि ग्लोबल कलरिंग ट्रेंडमध्ये असल्याने सलूनमधील खर्च वाढलेला आहे. मात्र ‘गार्नियर कलर कार’च्या माध्यमातून नागरिकांना विनामूल्य केस रंगवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे ग्राहकांना उत्पादनाची गुणवत्ता आणि सुरक्षिततेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी
मिळत आहे.
ही कलर कार एक फिरते अनुभव केंद्र असून, यामध्ये विविध रंगछटा पाहण्याची, उत्पादनांविषयी माहिती घेण्याची तसेच आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा रंग निवडण्यासाठी मार्गदर्शन मिळते. पारंपरिक काळा, तपकिरी आणि बर्गंडी या रंगांसोबतच ११ नवीन आकर्षक रंगछटांमुळे विशेषतः महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही मोहीम गार्नियर आणि ग्राहकांमधील नातेसंबंध अधिक मजबूत करीत आधुनिक महिलांमध्ये बदलत्या फॅशननुसार केस रंगवण्याची वाढती आवडही दर्शविणारी ठरत आहे.
ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर अशा अनेक भागांमध्ये ही कलर कार फिरत आहे. ग्राहकांशी थेट संवाद साधत ब्रँडविषयी विश्वास दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. गार्नियरचे विनामूल्य केस रंगवण्याचा लाभ घेण्यासाठी आपला परिसर, सोसायटी किंवा कार्यक्रमात गार्नियर कलर कारला बोलावायचे असेल, तर ००००००००० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
--‐--------------------------------------------------------
या मोहिमेअंतर्गत ‘बेस्ट लूक स्पर्धा’ घेण्यात येत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ग्राहकांनी गार्नियर हेअर कलर वापरावा. केस रंगवल्यानंतर त्याचा सुंदर फोटो समाजमाध्यमांवर अपलोड करायचा आहे. अपलोड करताना @Garnierindia, @Sakalmedia आणि @xpressadvert या हँडल्सना टॅग करणे आवश्यक आहे. समाजमाध्यमांवर पाठवलेल्या तुमच्या फोटोचा स्क्रीनशॉट आणि तुम्ही खरेदी केलेल्या हेअर कलर बॉक्ससोबतचा फोटो व्हॉट्सॲप क्रमांक ८५९१७३४५१० वर पाठवायचा आहे. निवडक स्पर्धकांना बक्षिसे आणि वृत्तपत्रात झळकण्याची संधी मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.