मुंबई

राष्ट्रीय कामांचा सेवांवर ताण

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : महापालिका निवडणुकीनंतर मतदारयाद्यांचे पुनरावलोकन आणि जनगणना अशा सलग राष्ट्रीय कामांमुळे ठाणे महापालिकेच्या दैनंदिन सेवांवर मोठा ताण पडला आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्व यंत्रणा या कामात गुंतल्याने नागरिकांना आपली कामे करून घेण्यासाठी महापालिकेच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.

ठाण्यातील दोन लोकसभा व चार विधानसभा मतदारसंघांतील मतदारयाद्यांची तपासणी, नोंदणी व नावांमध्ये बदल करण्याची कामे नुकतीच पूर्णत्वाकडे जात असताना महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यानंतर जवळपास तीन महिने अधिकारी-कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत व्यस्त राहिले. निवडणूक संपल्यानंतर नागरी कामे गती घेतील, अशी अपेक्षा असतानाच पुन्हा एसआयआर आणि जनगणना सुरू झाल्याने कर्मचारी पुन्हा राष्ट्रीय कामात अडकले.

महापालिकेत अधिकारी वेळेवर उपलब्ध नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अनेक अधिकारी बैठका किंवा व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये व्यग्र असतात, तर कर्मचारी राष्ट्रीय कामांमध्ये गुंतलेले असल्याने सामान्य नागरिकांची साधी कामेही प्रलंबित राहतात. दरम्यान, ही कामे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत होणे अपेक्षित असताना ती महापालिकेकडेच दिल्याने मनुष्यबळावर अतिरिक्त ताण पडत आहे, तर एसआयआर व जनगणनेत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा वापर होत असल्याने चुका होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran ceasefire : इराणने डोनाल्ड ट्रम्प यांची शस्त्रसंधी धुडकावली; हॉर्मुझमध्ये गोळीबार, भारताकडे येणारे जहाज IRGC ने घेतले ताब्यात

"इतकी मोठी माणसं असूनही त्यांना गर्व नाही" मटका किंग फेम विजयने केलं मराठी सहकलाकारांचं भरभरून कौतुक

ITR Filing 2026: ज्येष्ठ नागरिकांना ITR भरावा लागणार नाही का? जाणून घ्या नवा नियम

IPL 2026 : शुभमन गिलच्या संघातील स्टार खेळाडूची नको ती कृती, Viral Video ने अनेकांच्या भुवया उंचावल्या... वादाला फुटले तोंड

Viral Video: शेवटी आईच ती ! माकडीनीने पाळण्यात झोपलेलं बाळ पळवलं, पण दाखवलं मातृत्व; व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT