मुंबई

डोंबिवलीतील वाहतूक व्यवस्थेवर राजू पाटील यांचा संताप

CD

वाहतूक व्यवस्थेवर संताप
परिवहन मंत्र्यांनी हस्तक्षेप करावा ः राजू पाटील
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १९ : मनसे नेते राजू पाटील यांनी डोंबिवली व कल्याणमधील वाहतूक आणि परिवहन व्यवस्थेच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना उद्देशून केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी स्थानिक परिस्थितीवर कठोर शब्दांत टीका केली आहे.
पाटील यांनी म्हटले, की कल्याण-डोंबिवली परिसरातील परिवहन व्यवस्थापन अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. रिक्षा युनियनच्या दबावामुळे रिक्षाचालकांची मनमानी वाढली आहे. प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणे, नकार देणे तसेच वाहतुकीचे नियम न पाळणे अशा प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीही अधिकच वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच प्रताप सरनाईक हे पूर्वी डोंबिवलीत वास्तव्यास होते याची आठवण करून देत पाटील यांनी त्यांना या प्रश्नात तातडीने लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे.

ठोस उपाययोजना कराव्यात
या ट्विटनंतर डोंबिवली आणि कल्याणमधील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नागरिकांकडूनही या विषयावर संताप व्यक्त होत असून, प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. रिक्षा व्यवस्थेवर नियंत्रण, वाहतूक शिस्तीची अंमलबजावणी आणि नियोजनबद्ध परिवहन व्यवस्था उभारण्याची गरज अधोरेखित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalit Modi : दाऊद इब्राहिम, धमक्या अन् क्रिकेटमधून एक्झिट? ललित मोदींच्या खुलाशामागचं सत्य काय? पॅन्टमध्येच केली होती लघवी

Gold Rate Today: सोनं पुन्हा स्वस्त! सलग सहाव्या दिवशी भाव घसरले; महाराष्ट्रातील आजचा सोनं-चांदीचा दर जाणून घ्या

Monsoon Enters Kerala : मॉन्सून केरळमध्ये दाखल! हवामान विभागाचे तीन निकष पूर्ण?; महाराष्ट्रातही पावसाची चाहूल

कोण आहेत ऋतब्रत बॅनर्जी? TMCत फूट पाडत थेट ममतांना आव्हान; पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्र पॅटर्नटमुळे चर्चेत

Amar Mahajan Inspirational Story : अवघ्या 20 व्या वर्षी हृदयविकाराने निधन; पहिला पगार द्यायचा होता शाळेला, आई-वडिलांनी मृत अमरची 'ती' इच्छा केली पूर्ण

SCROLL FOR NEXT