

Monsoon Enters Kerala IMD update
esakal
Kerala monsoon 2026 : यंदाचा मॉन्सून लवकर येणार अशी चर्चा असली तरी जून महिन्यातच मॉन्सूनचे आगमण झाले. तिरुवनंतपुरम आणि कोची येथील हवामान रडार निरीक्षणांनुसार मागच्या २४ तासांत केरळ किनारपट्टी तसेच अंतर्गत भागांमध्ये मध्यम तीव्रतेचे विखुरलेले ढग दिसून आले. अरबी समुद्रातून वाहणारे पश्चिम ते नैऋत्य दिशेचे वारे २० ते २५ नॉट्स वेगाने सक्रिय असल्याने नैऋत्य मॉन्सूनच्या आगमनासाठी वातावरण अधिक अनुकूल होत असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात पुढच्या काही दिवसात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.