मुंबई

कल्याणात काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर

CD

काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर
कल्याणमध्ये बैठकीत शिवीगाळ, मारहाण?
कल्याण, ता. १९ (वार्ताहर) : कल्याणमध्ये काँग्रेस पक्षाच्या बैठकीदरम्यान मोठा वाद उफाळून आला. गटनेत्या नगरसेविका तथा महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी यांनी जिल्हाध्यक्ष राजकुमार पातकर यांना कानशिलात लगावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीदरम्यान काही मुद्द्यांवरून वाद निर्माण झाला. या वादात जिल्हाध्यक्ष राजकुमार पातकर यांनी कांचन कुलकर्णी यांच्याशी कथितरीत्या शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर संतापलेल्या कुलकर्णी यांनी त्यांना कानशिलात लगावल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात कांचन कुलकर्णी यांनी जिल्हाध्यक्षांनी शिवीगाळ केल्यामुळे मी त्यांना मारले, असा खुलासा केला आहे.
दरम्यान, राजकुमार पातकर यांनी हा प्रकार किरकोळ असल्याचे सांगत हा आमच्या कुटुंबातील वाद आहे आणि कुटुंबामध्ये अशा छोट्या गोष्टी घडत असतात, असे म्हणत प्रकरण वाढू नये यासाठी प्रयत्न केले. तरीही ही घटना कार्यकर्त्यांसमोर घडल्याने काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. या प्रकारामुळे कल्याण-डोंबिवली परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले असून, पक्षांतर्गत शिस्त आणि नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संघटनेसाठी धोकादायक
कल्याण जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीसाठी शनिवारी चिंचपाडा येथील अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये आयोजित बैठकीत मोठा वाद निर्माण झाला. केंद्रीय निरीक्षक पलक वर्मा आणि प्रदेश निरीक्षक राणी अग्रवाल यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत ‘भाडोत्री कार्यकर्ते’ आणल्याचा आरोप झाल्याने वातावरण तापले. सध्याचे अध्यक्ष राजकुमार पातकर यांच्या समर्थनार्थ बाहेरील आणि इतर पक्षांशी संबंधित लोकांना बैठकीत आणल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे जुन्या आणि निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. अनेक कार्यकर्त्यांनी याला संघटनेसाठी धोकादायक पाऊल असल्याचे म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: शशांक सिंगने दोन सोपे झेल टाकले; अर्शदीप भडकला, पाँटिंग तापला... श्रेयस अय्यरने काय केले ते पाहा Video Viral

तन्वी कोलते ठरली 'Bigg Boss Marathi 6' ची महाविजेती, राकेशचं स्वप्न राहिलं अपूरं

IPL 2026 Point Table: अपराजित पंजाब किंग्स! अव्वल स्थानावरील पकड मजबूत; लखनौ सुपर जायंट्सची अवस्था काय? पाहा गुणतालिका

US-Iran War: डील करा नाहीतर...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, संघर्षात निर्णायक टप्पा जवळ?

Akshaya Tritiya Gold Price : अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक, खरेदीही मोठ्या उत्साहात; २०,००० कोटींच्या विक्रीचा अंदाज

SCROLL FOR NEXT