मुंबई

वारकरी संप्रदायाचे संस्कारच नव्या पिढीला तारतील

CD

नव्या पिढीचे वारकरी मार्गदर्शक
वाड्यात आमदार हरिश्चंद्र भोये यांचे प्रतिपादन
वाडा, ता. २० (बातमीदार)ः आजच्या स्पर्धेच्या युगात तरुण पिढीला संस्काराची खरी गरज असून, शतकानुशतके सुरू असणारे वारकरी संप्रदायाचे विचार नव्या पिढीला मार्गदर्शक ठरतील, असे मत विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी मांडले. वाडा तालुक्यातील देवघर येथे उभारण्यात आलेल्या बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
देवघर येथील वारकरी शिक्षण संस्था ग्रामीण भागातील मुलांसाठी सांस्कृतिक केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी वारकरी शिक्षण संस्थेसाठी उभारलेल्या इमारतीचे उद्घाटन उद्योपती मोहन चंदावरकर यांच्याहस्ते झाले. या कार्यक्रमासाठी कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, आळंदीचे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे चिटणीस बाजीराव महाराज चंदिले, संस्थेचे अध्यापक भास्कर महाराज शिंदे, शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील, सामाजिक कार्यकर्ते विलास आकारे यांच्या सहपरिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: तिलक वर्माचे शतक अन् गोलंदाजांची कमाल... मुंबई इंडियन्सची GT च्या घरी धमाल; गुणतालिकेत मोठी झेप

Pune News : स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंनी दिली अतिरिक्त आयुक्तांना धमकी; सर्वसाधारण सभेत घडला प्रकार

BIGG BOSS Marathi: बिग बॉसच्या घरात तन्वी खरंच स्मोकिंग करायची का?, जिंकल्यानंतर म्हणते, बघितलं का?...

Pune Water Cut News: पुण्यात गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; बहुतांश भागात शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणी

IPL Records : तिलक वर्माची १८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी, मुंबई इंडियन्ससाठी झळकावले Fastest Hundred; अनेक पराक्रम

SCROLL FOR NEXT