वाढवणच्या महामार्गाला गती
भूसंपादनाच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत केंद्र सुरू
पालघर, ता. २० ः वाढवण महामार्ग प्रकल्पातील जमीनधारकांना भेडसावणाऱ्या विविध तांत्रिक, कागदपत्रीय अडचणी सोडवण्यासाठी तलाठी कार्यालय, मंडळ कार्यालय, भूमी अभिलेख विभागामार्फत विशेष सुविधा केंद्र उभारले आहे. या उपक्रमामुळे भूसंपादन प्रक्रियेतील अडचणी दूर होणार आहेत.
महामार्गासाठी आवश्यक जमीन संपादन करताना पोट हिस्स्याची मोजणी, वन हक्क दावे तसेच जमीन मालकांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसांची नोंदणी प्रक्रियांमध्ये अनेक नागरिकांना अडथळे येतात. त्यामुळे भूसंपादनाची गती मंदावली होती. या पार्श्वभूमीवर एकाच ठिकाणी सर्व सेवा मिळाव्यात यासाठी ही सुविधा केंद्रे सुरू केली आहेत. केंद्रांमध्ये पोट हिस्स्याच्या मोजणीसाठी अर्ज स्वीकारणे, वारस नोंदणी प्रक्रिया मार्गदर्शन, वन हक्क दाव्यांची तपासणी, आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी तज्ज्ञांची नियुक्ती केली असल्याचे जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
---------------------------------
२०५ जणांना मोबदल्याचे वाटप
वाढवण मार्गासाठी पालघर तालुक्यातील १२ गावांमधील ३३२ सातबाराचा धारकांकडून सुमारे २२५ हेक्टर तर डहाणू तालुक्यातील १४ गावांमधील ५०१ सातबारा धारकांमधून २४४.४८ हेक्टर जमीन संपादित करण्याचे प्रस्तावित आहे. या भूसंपादन प्रक्रिये जागेच्या मोबदल्यापोटी २००० कोटींचे वाटप होणे अपेक्षित असून, त्यापैकी २०५ सातबाराधारकांना जागेचा मोबदला वाटप झाल्याची माहिती आहे.
-----------------------------
या उपक्रमामुळे प्रलंबित प्रकरणांना गती मिळणार आहे. तसेच जमीनधारकांचा वेळ, खर्च वाचणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह सुविधा केंद्रांना भेट देऊन अडचणी नोंदवाव्यात.
- डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हाधिकारी
----------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.