मुंबई

चारोटी उड्डाणपुलापुढे ज्वलनशील टँकरचा अपघात;

CD

चारोटीजवळ टँकरला अपघात
केमिकलच्या गळतीमुळे वाहतूक प्रभावित
कासा, ता. २० (बातमीदार)ः चारोटी उड्डाणपुलाजवळ ज्वलनशील केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरला अपघात झाला होता. या वेळी टँकरमधील केमिकलची गळती सुरू झाल्याने मुंबई-अहमदाबाद मार्गावर काहीकाळासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
गुजरातहून मुंबईकडे निघालेल्या टँकरला सोमवारी सकाळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली. या धडकेत टँकरमधील केमिकलची गळती सुरू झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने कासा पोलिस ठाण्याला अपघाताची माहिती दिली. कासा पोलिस घटनास्थळी दाखल होताना संभाव्य धोका टाळण्यासाठी डहाणू तसेच तारापूर येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाने वायुगळती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्या, पण अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
------------------------
प्रशासकीय यंत्रणा तैनात
गळती झालेल्या टँकरमधील केमिकल दुसऱ्या टँकरमध्ये स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. परिसर सुरक्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा तैनात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रिल्समध्ये प्रामाणिकपणाचा आव, कारवाई टाळण्यासाठी मासिक हप्त्याची मागणी; ६ लाख घेताना तहसीलदाराला अटक; कोण आहे विजय चव्हाण?

T20 Squad: 501 धावा, 28 विकेट्स, 732 रन्स... तरीही या तीन मॅच विनर्सना टीम इंडियात जागा नाही; BCCI चा नेमका प्लॅन काय?"

Maharashtra Rain: मान्सून आला पण सक्रिय नाही; राज्यातील पावसाबाबत मोठं अपडेट, सरकारकडून शेतकऱ्यांना सतर्कतेचा सल्ला

Latest Marathi News Live Update : खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी बुलढाण्यात दाखल; पाणीटंचाईवर मोठा दिलासा

IND vs AFG Test: भारताने केला डाव घोषित, अफगाणिस्तानसमोर धावांचा डोंगर! गिल, राहुल, पंत, सुदर्शनसह वॉशिंग्टनचीही 'सुंदर' खेळी

SCROLL FOR NEXT