मुंबई

मेगाब्लॉकनंतरच डोंबिवलीत ‘घसरण’

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकदरम्यान करण्यात आलेल्या देखभाल व दुरुस्ती कामांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. रविवारी (ता. १९) मोठ्या प्रमाणात कामे पार पडल्याच्या अवघ्या काही तासांतच सोमवारी (ता. २०) सकाळी डोंबिवली स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरल्याची घटना घडल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी मुंबई प्रवासी संघटनेने केली आहे.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रविवारी मुलुंड-ठाणे-दिवा-डोंबिवली यादरम्यान फलाट विस्तार, रुळांची दुरुस्ती व देखभाल अशी कामे मेगाब्लॉकमध्ये करण्यात आली होती. या कामांमुळे साखरपुडा, लग्न, गृहप्रवेश आदी मुहूर्त साधताना चाकरमान्यांना कसरत करावी लागली. मात्र, या कामामुळे उपनगरी रेल्वेसेवा अधिक सुरक्षित व कार्यक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, पण सोमवारी कार्यालयीन कामकाजाच्या पहिल्या दिवशीच लोकल प्रवाशांना चांगल्याच हाल अपेष्ठांना सामोरे जावे लागले. मुंबईच्या दिशेने निघालेल्या लोकलचा रिकामा डबा रुळावरून घसरल्याने या कामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

लांब पल्ल्याच्या गाड्यांचा मुद्दा ऐरणीवर
मेगाब्लॉकदरम्यान उपनगरी सेवा बंद ठेवूनही त्याच मार्गावर लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू ठेवल्याची बाब समोर आली आहे. यामुळे देखभाल कामांमध्ये अडथळा निर्माण होण्यासोबतच रुळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झाल्याची टीका मुंबई प्रवासी संघाने केली आहे. तसेच, सध्या सुरू असलेल्या तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सुरक्षा उपाययोजना न करता कर्मचाऱ्यांकडून श्रमप्रधान काम करून घेतल्याबाबतही नाराजी व्यक्त होत आहे.

स्वतंत्र चौकशी करा!
मुंबई रेल प्रवासी संघाने या प्रकरणाची उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, मेगाब्लॉकमधील कामांचे कडक दर्जा परीक्षण, देखभालीखालील रुळावर लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक पूर्णपणे बंद करणे, स्वतंत्र कॉरिडॉरची निर्मिती आणि कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित कामकाजाच्या अटी लागू करण्याची मागणी संघटनेने केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशाराही संघटनेने दिला असून, संपूर्ण प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे प्रवासी संघटनेचे सिद्धेश देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: तिलक वर्माचे शतक अन् गोलंदाजांची कमाल... मुंबई इंडियन्सची GT च्या घरी धमाल; गुणतालिकेत मोठी झेप

Pune News : स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंनी दिली अतिरिक्त आयुक्तांना धमकी; सर्वसाधारण सभेत घडला प्रकार

BIGG BOSS Marathi: बिग बॉसच्या घरात तन्वी खरंच स्मोकिंग करायची का?, जिंकल्यानंतर म्हणते, बघितलं का?...

Pune Water Cut News: पुण्यात गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; बहुतांश भागात शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणी

IPL Records : तिलक वर्माची १८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी, मुंबई इंडियन्ससाठी झळकावले Fastest Hundred; अनेक पराक्रम

SCROLL FOR NEXT