खोपोलीत डम्पिंग ग्राउंडला आग
पाच तासानंतर आग आटोक्यात
खालापूर, ता. २० (बातमीदार) ः खोपोली शहरातील मिळगाव हद्दीत असलेल्या डम्पिंग ग्राऊंडला रविवारी (ता. १९) रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. अखेर खोपोली अग्निशमन दल, हेल्प फाउंडेशन, पोलिस आणि स्थानिक नागरिकांच्या पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
मिळगाव हद्दीतील डम्पिंग ग्राउंडला आग लागल्याची माहिती स्थानिकांनी प्रशासनाला दिली. आगीची भीषणता लक्षात घेता खोपोली नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तर, परिसरातील औद्योगिक कारखान्यांच्या अग्निशमन बंबांचीही मदत घेण्यात आली. तब्बल पास तासांच्या अथक प्रयत्नानंतर पाच अग्निशमन बंबाच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले. आग विझल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.