लाडकी बहीण योजना कोणीही बंद करू शकत नाही ः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
तळा, ता. २० (प्रतिनिधी) ः राज्यात सुरू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणीही बंद करू शकत नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तळा तालुक्यातील बोरीचा माळ येथे लक्ष्मीनारायण मंदिर जीर्णोद्धार सोहळा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. या वेळी ते बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले की, लाडकी बहीण योजना बंद व्हावी यासाठी बऱ्याच जणांनी विविध प्रकारचे प्रयत्न केले, परंतु त्या सर्वांना पुरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आजही सुरळीतपणे सुरू आहे आणि जोपर्यंत माझ्या लाडक्या बहिणींचा भाऊ हा एकनाथ शिंदे आहे, तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही. याप्रसंगी व्यासपीठावर मंत्री भरत गोगावले, आमदार तुकाराम काते, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, संपर्कप्रमुख अनिल नवगणे, तालुकाप्रमुख प्रदुम ठसाळ, शहरप्रमुख राकेश वडके, कोअर कमिटी सदस्य लीलाधर खातू यांसह शिवसेनेचे सर्व नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाणी योजनेसाठी निधीचे आश्वासन
राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही अहोरात्र झटत असतो. मी मुख्यमंत्री असताना जवळपास साडेपाचशेच्या वरती लोकहिताचे निर्णय घेतले आणि यापुढेही कायम जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहणार आहोत. या वेळी तळा शहराच्या पाणी योजनेसाठी वाढीव सहा कोटी रुपयांचा निधी तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मागितला असता त्याचीही पूर्तता लवकरच केली जाईल, असे आश्वासनही या वेळी एकनाथ शिंदे यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.