सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : घोडबंदर मार्गावरील भाईंदरपाडा परिसरातील लोढा स्प्लेंडोरा येथील इग्निस सोसायटीमध्ये रविवारी (ता. १९) रात्री लागलेल्या आगीमुळे एक सदनिका खाक झाली. बी विंगमधील १६व्या मजल्यावरील रूम क्र. १६०२ मध्ये ही आग लागली होती. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला रात्री सुमारे पावणेदहा वाजता आगीबाबत माहिती मिळाली. कासारवडवली पोलिस, अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांना सुमारे साडेदहा वाजताच्या सुमारास त्या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीत फ्लॅटमधील कागदपत्रे, बेड, सोफा, संगणक, मोबाईल, देव्हारा तसेच इतर घरगुती साहित्य जळून नुकसान झाले. संबंधित फ्लॅटचे मालक शंतनू जोशी असून, आग लागली तेव्हा फ्लॅट बंद होता. रहिवासी बाहेर गेल्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, दोन अग्निशमन वाहने, एक रेस्क्यू वाहन, एक जम्बो वॉटर टँकर पाचारण केला होता, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.