मुंबई

विहिरीतून मिळणार शुद्ध पाणी

CD

विहिरीतून मिळणार शुद्ध पाणी
पुनर्जीवित विहिरींचे लोकार्पण; आरो प्लांटचा शुभारंभ

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. २० : वाढत्या पाणीटंचाईवर उपाय म्हणून लोकमान्यनगर परिसरातील जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करून त्यावर आर. ओ. प्लांट उभारण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना आता थेट विहिरीतून शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाईत मोठा दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकमान्यनगर पाडा क्र. १ आणि २ तसेच उन्नती गार्डन परिसरातील विहिरींचे पुनरुज्जीवन करून त्यांचे लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील अनेक विहिरी कचरा व सांडपाण्यामुळे निष्क्रिय झाल्याने नैसर्गिक जलस्रोत नष्ट होण्याच्या मार्गावर होते. या पार्श्वभूमीवर विहिरींची वैज्ञानिक पद्धतीने साफसफाई, गाळ काढणे आणि संरक्षक उपाययोजना करून त्यांना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेतला. सरनाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात ठाणे व मिरा-भाईंदर शहरांतील ४६ विहिरींसाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत १२ विहिरींचे काम पूर्ण झाले असून, दर आठवड्याला तीन ते चार विहिरी पुनर्जीवित करण्याचे नियोजन आहे.
---------------
पर्यायी जलस्त्रोतांचा आधार

विहिरींमध्ये सांडपाणी मिसळू नये, यासाठी जाळ्या बसविणे, भिंतींचे बळकटीकरण तसेच नियमित स्वच्छता राखणे अशा उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचबरोबर बसविण्यात आलेल्या आर. ओ. प्लांटमुळे पाणी अधिक शुद्ध व सुरक्षित बनविण्यात येत असल्याची माहिती या वेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. तसेच महापालिकेचा पाणीपुरवठा अपुरा पडल्यास किंवा खंडित झाल्यास या विहिरी नागरिकांसाठी पर्यायी जलस्रोत ठरणार असून, वर्षभर शुद्ध पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: तिलक वर्माचे शतक अन् गोलंदाजांची कमाल... मुंबई इंडियन्सची GT च्या घरी धमाल; गुणतालिकेत मोठी झेप

Pune News : स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंनी दिली अतिरिक्त आयुक्तांना धमकी; सर्वसाधारण सभेत घडला प्रकार

BIGG BOSS Marathi: बिग बॉसच्या घरात तन्वी खरंच स्मोकिंग करायची का?, जिंकल्यानंतर म्हणते, बघितलं का?...

Pune Water Cut News: पुण्यात गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; बहुतांश भागात शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणी

IPL Records : तिलक वर्माची १८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी, मुंबई इंडियन्ससाठी झळकावले Fastest Hundred; अनेक पराक्रम

SCROLL FOR NEXT