मुंबई

रस्त्यावर दुतर्फा वाहन पार्किंग मुळे वाहतुक कोंडीत भर

CD

नवी मुंबईत रस्त्यांवरील दुतर्फा पार्किंगचा विळखा
वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण
वाशी, ता. २० (बातमीदार) ः नवी मुंबई पालिका क्षेत्रातील सर्वच नोडमध्ये रस्त्यावर दुतर्फा बेकायदा पार्किंग केल्यामुळे वाहतूक कोंडीत मोठी भर पडत आहे. यामुळे वाहनचालकांचा वेळ आणि इंधन वाया जात असून, पादचाऱ्यांनाही रस्ता पार करताना कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे, अनेक ठिकाणी दुकानदारांनी स्वतःच्या सोयीसाठी पालिकेचे नो पार्किंगचे फलकच काढून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे.
पालिकेने सर्व नोडमध्ये सम-विषम आणि नो पार्किंगचे फलक लावलेले आहेत, पण काही दुकानदांरानी दुकानांसमोरील फलकच काढून टाकले आहेत. त्यातच झोपडपट्टी परिसरांमधील असणाऱ्या चिचोंळ्या रस्त्यावर दुतर्फा पार्किंग होत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावर दिघा व तुर्भे येथील रुंदीकरणाचे काम रखडल्यामुळे हा रस्ता अरुंद झाला आहे. रस्त्यातच बस थांबा आणि रिक्षा स्टॅण्ड असल्याने आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहने पार्किंग करण्यात येतात. यामुळे सकाळ-संध्याकाळच्या वेळीस वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे स्कूल बस, रुग्णवाहिका, एनएनएमटीच्या बसेस, रिक्षाचालकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते. तरी दुतर्फा बेकायदा पार्किंगला आळा घालण्याची मागणी नवी मुंबईकरांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात वाहतूक पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

पाम बीच मार्गावरील कोपरी रस्त्यावर वाहतूक कोंडी
पाम बीच मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होऊन कोपरी गावापासून एपीएमीसीच्या रस्त्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. नागरिकांना तासनतास एकाच ठिकाणी अडकून राहावे लागत असल्याने चालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. यामुळे वाहनचालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

कोंडीची प्रमुख ठिकाणे
ठाणे-बेलापूर मार्गावरील रबाळे टी जंक्शनपासून रबाळे रेल्वे स्थानकापर्यंत
वाशी सेक्टर ९, १० सेक्टर १५ व १६ या वसाहतीतील अंतर्गत रस्त्यावर
कोपरखैरणे भागातील सेक्टर १९ आणि माथाडी वसाहतीतील रस्त्यावर
ऐरोली बस आगार आणि स्थानक भागांत
घणसोली, सानपाडा, नेरूळ आणि सीबीडी बेलापूर परिसरात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Airstrike Iran : जग युद्धाच्या उंबरठ्यावर! डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्ला धुडकावून इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला

Ratnagiri Monsoon Update 2026 : कोकणात पाऊस कधी जोर धरणार? रत्नागिरी-सिंधुदुर्गात 9 जूनपर्यंत अलर्ट; IMD चा नवा अंदाज, तळकोकणात मॉन्सूनची काय स्थिती?

Mumbai Marathi Schools: मुंबईतील मराठी शाळांवर संकट; ५७ शाळा बंद होण्याच्या मार्गावर, संचमान्यता निकषांवर प्रश्नचिन्ह

Sant Dnyaneshwar Maharaj palkhi: ज्ञानेश्वर माउली पालखी रथ बैलजोडीवरून वाद; रानवडे कुटुंबीयांना मान, मात्र देवस्थानचे पत्र नाही

मिथुन चक्रवर्ती यांना पहिल्या प्रेमात मिळालेला धोका, म्हणालेले...'ती सोडून गेली नसती तर आज मी...'

SCROLL FOR NEXT