मुंबई

ठाण्यात तीन दिवसीय भव्य ग्रंथोत्सव

CD

ठाण्यात तीनदिवसीय भव्य ग्रंथोत्सव
साहित्यप्रेमींसाठी पर्वणी

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : ठाणे शहरातील साहित्यप्रेमींसाठी तीनदिवसीय भव्य ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, २४ ते २६ एप्रिलदरम्यान ठाणे पूर्व येथील अष्टविनायक चौक, शिवनेरी मैदान येथे हा सोहळा रंगणार आहे. कृष्णा प्रकाशन ठाणे, स्वराज सेवा मंडळ आणि नुपूर आर्ट अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या ग्रंथोत्सवात पुस्तक प्रदर्शन, प्रकाशन सोहळे आणि विविध साहित्यिक उपक्रमांची आकर्षक रेलचेल अनुभवायला मिळणार आहे.

ग्रंथोत्सवाचा शुभारंभ शुक्रवारी (ता. २४) सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून, तीन दिवस ठाणेकरांना साहित्याचा समृद्ध आणि बहुरंगी अनुभव देणार आहेत. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार, खासदार नरेश म्हस्के, ग्रंथाली प्रकाशनाचे सुदेश हिंगलासपुरकर, नितीन तेंडुलकर तसेच मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. या वेळी लेखक विद्याधर ठाणेकर यांचे ‘विश्व विक्रमादित्य सचिन’ तसेच वृंदा दाभोलकर लिखित ‘शब्दांच्या पलीकडले पाडगावकर’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन होणार आहे.

ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. २५) विविध साहित्यिक कार्यक्रमांसह भव्य कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कविसंमेलनात विनोद पितळे, प्रशांत डिंगणकर, माधव डोळे, सुप्रिया हळबे, रुपेश पवार, प्रतिक्षा बोर्डे आदी कवी आपल्या कवितांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. तिसऱ्या दिवशी रविवारी (ता. २६) विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
------------------
वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, ‘माझ्या स्वप्नातील भारत’, ‘अपयश यशाची पहिली पायरी’, ‘आदर्श कोणाचा ठेवावा’ असे विषय दिले आहेत, तर खुल्या गटासाठी ‘संविधान आणि समान नागरी हक्क’, ‘पुस्तक आणि वाचन संस्कृतीचे महत्त्व’ तसेच ‘मानवी बुद्धिमत्ता की कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)’ असे समकालीन विषय ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार असून, अधिक माहितीसाठी आयोजकांशी संवाद साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: तिलक वर्माचे शतक अन् गोलंदाजांची कमाल... मुंबई इंडियन्सची GT च्या घरी धमाल; गुणतालिकेत मोठी झेप

Pune News : स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंनी दिली अतिरिक्त आयुक्तांना धमकी; सर्वसाधारण सभेत घडला प्रकार

BIGG BOSS Marathi: बिग बॉसच्या घरात तन्वी खरंच स्मोकिंग करायची का?, जिंकल्यानंतर म्हणते, बघितलं का?...

Pune Water Cut News: पुण्यात गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; बहुतांश भागात शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणी

IPL Records : तिलक वर्माची १८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी, मुंबई इंडियन्ससाठी झळकावले Fastest Hundred; अनेक पराक्रम

SCROLL FOR NEXT