मुंबई

ठाण्याचा हर्ष राऊत जागतिक रिले स्पर्धेसाठी सज्ज

CD

हर्ष राऊत जागतिक रिलेसाठी सज्ज
भारताचे प्रतिनिधित्व करणारा ठाण्यातील पहिला खेळाडू

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. २० : ठाणे शहरासाठी अभिमानाची बाब ठरत, ठाणे महापालिका अ‍ॅथलेटिक प्रशिक्षण योजनेचा (टीएमसीएपीवाय) उदयोन्मुख धावपटू हर्ष राऊत याची येत्या २ व ३ मे २०२६ रोजी बोत्सवानातील गॅबरोन येथे होणाऱ्या प्रतिष्ठित जागतिक ॲथलेटिक्स रिले चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. या ॲथलेटिक्सच्या वरिष्ठ स्तरावरील स्पर्धेत सहभागी होणारा हर्ष हा ठाण्यातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.

या यशाबद्दल बोलताना हर्ष राऊत म्हणाला, एवढ्या मोठ्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. या स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्याचा मला विश्वास आहे. माझ्यावर विश्वास ठेवून साथ देणाऱ्या माझ्या पालकांचे मी मनापासून आभार मानतो. यावर्षीच्या सुरुवातीला हर्षची भारतीय रिले शिबिरासाठी निवड झाली होती. मागील हंगामात त्याची कामगिरी विशेष ठरली. एप्रिलमध्ये जयपूर येथील इंडियन ओपन सिरीज स्पर्धेत तसेच नवी दिल्लीतील स्पर्धांमध्ये त्याने सहभाग घेत सातत्यपूर्ण कामगिरी केली.

त्याने आपल्या वैयक्तिक सर्वोत्तम वेळेच्या जवळ पोहोचत उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला आहे. जागतिक ॲथलेटिक्स रिले चॅम्पियनशिपमध्ये जगातील अव्वल २४ देश सहभागी होणार असल्याने ही स्पर्धा अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. ठाण्यासारख्या शहरात ॲथलेटिक्ससाठी अद्याप मूलभूत सुविधा अपुऱ्या असताना हर्षने मिळवलेले हे यश विशेष महत्त्वाचे ठरत आहे. प्रशिक्षक नीलेश पाटकर यांनी हर्षच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत, ठाणे शहरात खेळाडूंना दर्जेदार ॲथलेटिक ट्रॅक व सुविधा उपलब्ध करून देण्याची गरजही अधोरेखित केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India T20I Squad for England Tour: अक्षर पटेलची उपकर्णधारपदावरून हाकालपट्टी, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूकडे सोपवली जबबादारी

Illegal Liquor: पुण्यातील घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा सर्जिकल स्ट्राइक, ३ हजारपेक्षा जास्त गुन्हे दाखल

Asian Games 2026 : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील भारतीय संघाची घोषणा, सलग दुसरं गोल्ड मेडल मिळवण्याच्या हेतूने उतरणार मैदानात

देशात खळबळ! मोठा पक्ष फुटणार? १६ खासदारांचे फोन बंद, २२ खासदार पक्ष फोडण्यास तयार; मुख्यमंत्री दिल्लीत तळ ठोकून

India T20I Squad for England Tour: सूर्याला डच्चू! अडीच वर्षांपासून बाहेर असलेला खेळाडू झाला कर्णधार; वैभव सूर्यवंशीचीही निवड

SCROLL FOR NEXT