मुंबई

उन्हाच्या तडाख्यात गॅलरीतील भंगार पेटले

CD

गॅलरीतील भंगाराला आग
टिटवाळ्यात थरारक प्रसंग; नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली

टिटवाळा, ता. २० (वार्ताहार) : उन्हाच्या प्रचंड उष्णतेमुळे घराच्या गॅलरीत ठेवलेल्या भंगाराला आग लागल्याची घटना सोमवारी (ता. २०) दुपारी टिटवाळ्यात घडली. पूर्वेतील गणेश मंदिर रोड परिसरातील अभिदर्शन होम्समधील घर क्रमांक ४०५ मध्ये हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित फ्लॅटच्या गॅलरीमध्ये प्लॅस्टिक, कचरा व इतर ज्वलनशील भंगार मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आला होता. दुपारच्या कडक उन्हामुळे या वस्तूंमध्ये उष्णता साचून अचानक आग लागली. काही क्षणातच गॅलरीतून धूर आणि आगीच्या ज्वाळा पसरल्या. आगीची माहिती मिळताच सोसायटीतील नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत तत्काळ धाव घेतली. पाण्याच्या सहाय्याने आणि तत्परतेने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. या वेळी नागरिकांनी तातडीने केलेल्या प्रयत्नांमुळे वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. नाहीतर ही आग इतर खोल्यांमध्ये पसरण्याची दाट शक्यता होती.

दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गॅलरीतील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे. अशा प्रकारे गॅलरीत ज्वलनशील भंगार साठवण्याच्या निष्काळजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, रहिवाशांनी याबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासनानेही नागरिकांना आवाहन केले आहे की, उष्णतेच्या पार्श्वभूमीवर घराच्या गॅलरीत किंवा खुल्या जागेत ज्वलनशील वस्तू साठवू नयेत अन्यथा अशा दुर्घटना कधीही घडू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: तिलक वर्माचे शतक अन् गोलंदाजांची कमाल... मुंबई इंडियन्सची GT च्या घरी धमाल; गुणतालिकेत मोठी झेप

Pune News : स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंनी दिली अतिरिक्त आयुक्तांना धमकी; सर्वसाधारण सभेत घडला प्रकार

BIGG BOSS Marathi: बिग बॉसच्या घरात तन्वी खरंच स्मोकिंग करायची का?, जिंकल्यानंतर म्हणते, बघितलं का?...

Pune Water Cut News: पुण्यात गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; बहुतांश भागात शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणी

IPL Records : तिलक वर्माची १८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी, मुंबई इंडियन्ससाठी झळकावले Fastest Hundred; अनेक पराक्रम

SCROLL FOR NEXT