मुंबई

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी बैठक घ्या

CD

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी बैठक घ्या : आमदार म्हात्रे

टोकावडे, ता. २० (बातमीदार) : राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित शैक्षणिक प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी तातडीने मंत्रीस्तरीय बैठक आयोजित करावी, अशी मागणी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे यांनी शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हात्रे यांनी विविध मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे. राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे डिजिटायझेशन करताना तांत्रिक अडचणी निर्माण होत असून, मार्च २०२६चा अडकलेला पगार तातडीने देण्यात यावा. तसेच डिजिटल प्रक्रिया सुरळीत होईपर्यंत कोणाचाही पगार थांबवू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईपर्यंत संबंधितांना जुन्या शाळेतूनच पगार देण्याची व्यवस्था करावी. आदिवासी विभागातील खासगी शाळांतील शिक्षकांना एकसमान वेतनश्रेणी लागू करावी, असेही निवेदनात नमूद आहे.

जनगणना कामकाजाच्या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यात अनेक नागरिक गावी नसल्याने माहिती संकलनात अडचणी येत आहेत. त्यामुळे जनगणनेचा कालावधी १ ते १० जूनदरम्यान ठेवावा, अशी सूचना करण्यात आली आहे. तसेच बीएलओ काम करताना आजारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करावे, संच मान्यता दुरुस्तीमुळे अनेक शाळांचे पगार प्रलंबित असून, ती तातडीने पूर्ण करावी. तसेच निकषांनुसार संच मान्यता सुधारणा होईपर्यंत समायोजन न करता पगार सुरळीत ठेवावेत, असेही म्हटले आहे.
---------------
सेवानिवृत्तीपर्यंत लाभ द्या
विद्यार्थीसंख्या कमी असली तरी मुख्याध्यापकांना त्याच शाळेत वेतन संरक्षणासह ठेवून सेवानिवृत्तीपर्यंत लाभ द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Recruitment : जिद्दीला सलाम! गवंडी काम करत धरणग्रस्त शब्बीर सय्यद यांची मुंबई लोहमार्ग पोलीस भरतीत चमकदार झेप

Who is Krish Bhagat? ३ दिवसांपूर्वी रिप्लेसमेंट, आज Mumbai Indians कडून पदार्पण; आमदाराचा पुतण्या IPL 2026 गाजवण्यासाठी सज्ज

Maharashtra Police Transfers : कोल्हापूर, सांगली जिल्ह्याच्या एसपींची बदली, पोलिस प्रशासनात मोठे बदल

Nashik Crime : भोंदू खरातला पाचव्या गुन्ह्यात २३ पर्यंत कोठडी; बचावपक्षाचा जोरदार विरोध

Chakur Crime News: नवऱ्याच्या प्रेयसीला फसवण्यासाठी चुलतीकडून पुतण्याचा खून

SCROLL FOR NEXT