मुंबई

कॉलम

CD

निशिकांत दुबे यांच्या विरोधात आंदोलन
भिवंडी (वार्ताहर) : भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मराठी नेतृत्वावर कथित चुकीचे वक्तव्य केले होते. त्याविरोधात ठाकरे गटाकडून राज्यभर निषेध केला जात आहे. भिवंडीत ठाकरे गटाचे भिवंडी पूर्व-पश्चिम सहसंपर्कप्रमुख मनोज गगे, पूर्व-पश्चिम विधानसभा जिल्हाप्रमुख उमेश कोंडलेकर यांच्या नेतृत्वाखाली मध्यवर्ती शाखेसमोर निदर्शने करीत खासदार निशिकांत दुबे यांच्या छायाचित्राला जोडे मारून संताप व्यक्त केला आहे. या आंदोलनात दीपाली जैन, दिलीप नाईक, महेंद्र कुंभारे, सुभाष (नाना) झळके, गजेंद्र गुळवी, प्रदीप बोडके, दिलीप कोंडलेकर, गोकुळ कदम, भाऊ काठवले, स्वाती भावार्थ यांसह शिवसैनिक सहभागी झाले होते.
----.
पडघ्यात शिवजयंती उत्साहात साजरी
पडघा (बातमीदार) : वाढत्या नागरीकरणामुळे चर्चेत आलेल्या पडघा येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अक्षय तृतीयाच्या निमित्ताने सार्वजनिक शिंवजयती उत्सव मंडळ पडघे व परिसर यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा येथे शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (ता. १९) सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शिवप्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली. संध्याकाळी शिवाजी महाराजांचा पुतळा, वेशभूषा केलेल्या राजमाता जिजाऊ व बालशिवाजी यांची सजविलेल्या रथातून संपूर्ण पडघे गावात ढोल- ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या वेळेस खडवली येथील पथकाने शिवकालीन शस्त्रे, लाठी, काठी, दांडपट्टा यांची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
---
रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
भिवंडी (बातमीदार) : श्री भैरव सेवा समितीचे संस्थापक पुष्पतराज जैन यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त रविवारी (ता. १९) श्री भैरव चॅरिटेबल आय हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर पार पडले. या रक्तदान शिबिरात भिवंडीतील ६० वर्षीय भरत कृष्णाजी शेटे उर्फ अप्पी शेटे यांनी ६३ व्यांदा रक्तदान केले. थॅलेसेमियाग्रस्त मुलांसाठी आयोजित या रक्तदान शिबिरामध्ये शहरातील डॉक्टर आणि सामाजिक संस्था सहभागी झाल्याने रक्तदात्यांनी दिवसभर उत्तम सहभाग नोंदविला. या रक्तदान शिबिरात श्री भैरव सेवा समितीचे आणि सहभागी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य तसेच शहरातील मान्यवरांनी उपस्थित राहून रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : जसप्रीतने नव्या चेंडूने गोलंदाजी का केली नाही? हार्दिकचे चकीत करणारे विधान; म्हणाला, ती माझी समस्या नाही

IPL 2026 Point Table: तिलक वर्माचे शतक अन् गोलंदाजांची कमाल... मुंबई इंडियन्सची GT च्या घरी धमाल; गुणतालिकेत मोठी झेप

Pune News : स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंनी दिली अतिरिक्त आयुक्तांना धमकी; सर्वसाधारण सभेत घडला प्रकार

BIGG BOSS Marathi: बिग बॉसच्या घरात तन्वी खरंच स्मोकिंग करायची का?, जिंकल्यानंतर म्हणते, बघितलं का?...

Pune Water Cut News: पुण्यात गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; बहुतांश भागात शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणी

SCROLL FOR NEXT