मुंबई

महावितरण अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना

CD

वीज समस्येवर आमदारांचा तोडगा
बोईसर, ता. २० (वार्ताहर) : विधानसभा मतदारसंघातील शहरी व ग्रामीण भागात विद्युत रोहित्रे खराब झाल्यामुळे नागरिकांना विजेच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्यांवर आमदार विलास तरे यांनी महावितरण अधिकाऱ्यांशी बैठक घेतली.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितीचे (महावितरण) अधीक्षक अभियंता मदन सांगळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आमदार तरे यांनी समस्यांचा आढावा घेतला. या वेळी मौजे कोकणेर, दुर्वेश, सातिवली, गांजे, केलीचा पाडा, जायशेत, पाचामुवा, हालोली भागातील खराब रोहित्रे तत्काळ दुरुस्त किंवा बदलण्याची मागणी करण्यात आली. तसेच वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, वाढती वीज मागणी आणि वितरण व्यवस्थेतील त्रुटींवरही सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीस पालघर शिवसेना जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य अजय दिवे, शहराध्यक्ष अतुल देसाई व झाकीर साठी आदी उपस्थित होते. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या अडचणींची दखल घेत महावितरण अधिकाऱ्यांनी लवकरच प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: तिलक वर्माचे शतक अन् गोलंदाजांची कमाल... मुंबई इंडियन्सची GT च्या घरी धमाल; गुणतालिकेत मोठी झेप

Pune News : स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंनी दिली अतिरिक्त आयुक्तांना धमकी; सर्वसाधारण सभेत घडला प्रकार

BIGG BOSS Marathi: बिग बॉसच्या घरात तन्वी खरंच स्मोकिंग करायची का?, जिंकल्यानंतर म्हणते, बघितलं का?...

Pune Water Cut News: पुण्यात गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; बहुतांश भागात शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणी

IPL Records : तिलक वर्माची १८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी, मुंबई इंडियन्ससाठी झळकावले Fastest Hundred; अनेक पराक्रम

SCROLL FOR NEXT