मुंबई

तीन लाखांचे मोबाईल शोधण्यात अंबरनाथ पोलिसांना यश

CD

अंबरनाथ, ता. २० (वार्ताहर) : शहरात वाढत्या मोबाईल चोरी आणि फोन हरविल्याच्या घटनांमध्ये अंबरनाथ पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत सुमारे तीन लाखांचे १२ मोबाईल शोधून काढले आहेत. सीईआयआर पोर्टलच्या साह्याने केलेल्या तांत्रिक तपासामुळे हे यश मिळाले असून, हे मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.

गेल्या वर्षभरात अंबरनाथ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक मोबाईल चोरी व हरविल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. २०२३ ते २०२६ या कालावधीत विविध कंपन्यांचे मोबाइल हरवल्याच्या तक्रारींवरून गुन्हे नोंदविण्यात आले होते. या सर्व प्रकरणांचा एकत्रित तपास करत पोलिसांनी सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून मोबाईलचा माग काढत एकूण १२ मोबाईल हस्तगत करण्यात अंबरनाथ पोलिसांना यश आले आहे. पोलिस उपआयुक्त सचिन गोरे, सहाय्यक आयुक्त शैलेश काळे, वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद आणि निरीक्षक (गुन्हे) उमेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत पोलिस शिपाई मंगेश सूर्यवंशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

Privatization of Schools : बहुमताच्या जोरावर शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT